शिवसेनेचे महागाईविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:36 AM2017-09-21T00:36:44+5:302017-09-21T00:36:59+5:30

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव दोन महिन्यात २० रुपयाच्यावर वाढविले. त्यामुळे महागाईत वाढ झाली असून याविरोधात पुसद, महागाव आणि उमरखेड शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.

 Movement against Shiv Sena's inflation | शिवसेनेचे महागाईविरोधात आंदोलन

शिवसेनेचे महागाईविरोधात आंदोलन

Next
ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : पुसद, उमरखेड, महागाव येथे मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड/महागाव : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव दोन महिन्यात २० रुपयाच्यावर वाढविले. त्यामुळे महागाईत वाढ झाली असून याविरोधात पुसद, महागाव आणि उमरखेड शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
पुसद येथे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र साकला, उमाकांत पापीनवार, तालुका प्रमुख विकास जामकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकºयांनी निवेदन सादर केले. यावेळी संतोष दरणे, गणेश पागिरे, मोहन विश्वकर्मा, मधुकर कलिंदर, सोपीनाथ माने, विष्णू शिखारे, दीपक उखळकर, राजू महाजन, अरुण पवार, विलास काळे, रवी इनामे, सुर्वे पाटील उपस्थित होते.
उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण मिरासे, तालुका प्रमुख बळीराम मुटकुळे, उत्तमराव वानखेडे, डॉ.विश्वनाथ विणकरे यांनी केले. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, आॅनलाईनची अट रद्द करावी, पेट्रोल-डिझेलचे भाव नियंत्रणात ठेवावे आदी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी प्रशांत पत्तेवार, बाबुराव कदम, नगरसेवक गजेंद्र ठाकरे, रेखा गव्हाळे, निर्मला विणकरे, सविता कदम, सुरेखा माकोडे, अशोक थोटे, सतीश नाईक, रेखा भरणे, राजेश नलावडे, मिलिंद धुळे, शिवशंकर पांढरे, रामराव नरवाडे, गजानन सोळंके, संजय पळसकर, अ‍ॅड.जितेंद्र पवार, शिवाजी रावते यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. महागाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बी.एन. चव्हाण, पंचायत समिती सदस्य राम तंबाखू, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उपजिल्हा प्रमुख राजू खामनेरकर, प्रकाश पांडे, किशोर बोम्पिलवार, रवींद्र भारती, प्रमोद भरवाडे, दिशांत पांगरकर, बाळू जाधव आदी उपस्थित होते.

Web Title:  Movement against Shiv Sena's inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.