रेमडिसिव्हिर उपलब्ध न झाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:38 AM2021-04-12T04:38:06+5:302021-04-12T04:38:06+5:30

रेमडिसिव्हिर इंजेक्शन कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी ठरत आहे. मात्र, त्याच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंजेक्शन त्वरित उपलब्ध ...

Movement if remedicivir is not available | रेमडिसिव्हिर उपलब्ध न झाल्यास आंदोलन

रेमडिसिव्हिर उपलब्ध न झाल्यास आंदोलन

Next

रेमडिसिव्हिर इंजेक्शन कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी ठरत आहे. मात्र, त्याच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून रुग्णांचे जीव वाचविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांनी हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

तालुक्यात कोविड रुग्णांसाठी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये ५० बेड, आयकॉन हॉस्पिटलमध्ये ३०, वडते हॉस्पिटलमध्ये ३०, लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये १५, राजेश चव्हाण हॉस्पिटलमध्ये १५ बेड अशी व्यवस्था आहे. हे हॉस्पिटल रुग्णांनी फुल आहे. प्रत्येक रुग्णाला सहा इंजेक्शनची मात्रा द्यावी लागते. त्यात शासनाकडून आवश्यकतेपेक्षा अर्धाच साठा उपलब्ध होत आहे. परिणामी रुग्ण दगावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रेमडिसिव्हिर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन साकिब शहा यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, ना. बच्चू कडू, आमदार अबू असीम आझमी तसेच जिल्हाधिकारी आदींना पाठविले आहे.

Web Title: Movement if remedicivir is not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.