मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:27 PM2018-07-24T22:27:59+5:302018-07-24T22:28:42+5:30
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. यामुळे गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठा कुणबी क्रांती मोर्चा समितीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. यामुळे गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठा कुणबी क्रांती मोर्चा समितीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. यवतमाळात तिरंगा चौकात ठिय्या देऊन सरकारचा निषेध नोंदविला.
यावेळी काकासाहेबांना तिरंगा चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ठिय्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांनी शहरात निषेध रॅली काढून व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद केली.
दरम्यान मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. उमरखेड, महागाव, पुसद, दारव्हा आदी तालुक्यांमध्ये तीव्र स्वरूपात आंदोलने करण्यात आली. यवतमाळातील आंदोलनात प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, अरूण राऊत, नानाभाऊ गाडबैले, डॉ. दिलीप महाले, वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, राजेंद्र गायकवाड, छाया महाले, वैशाली सवई, राहुल ठाकरे, स्वाती येंडे, सृष्टी दिवटे, अनिल देशमुख, उद्धवराव साबळे, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, रोहीत देशमुख, राहुल कानारकर, दिनेश गोगरकर, बाळासाहेब काळे, विजय काळे, अरूण राऊत, चंद्रशेखर चौधरी, सुरेश चिंचोळकर, विक्की राऊत, कौस्तुभ शिर्के, सीमा तेलंग, योगेश धानोरकर, मोहन देशमुख, अरविंद वाढोणकर आदी उपस्थित होते.
समाजाच्या बदनामीचा मुख्यमंत्र्यांचा डाव
विठ्ठलाच्या पूजेला न जाण्यामागे मराठा आंदोलकाचे कारण मुख्यमंत्री फडणवीसांनी पुढे केले. आंदोलक साप सोडणार असल्याचे वक्तव्य केले. हा प्रकार मराठ्यांना बदनाम करण्याचा डाव आहे. त्यांना मराठा आणि वारकऱ्यांमध्ये भांडण लावायचे आहे, असा आरोप डॉ. दिलीप महाले यांनी केला. सरकार चुकीच्या पद्धतीने आंदोलन हाताळत असल्याचा आरोपही केला.