सावळी सदोबा येथे नामांतरासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:47+5:302021-06-30T04:26:47+5:30
सावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे वसंतराव नाईक चौकात ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी साेमवारी मटका फोडो ...
सावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे वसंतराव नाईक चौकात ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी साेमवारी मटका फोडो आंदोलन करण्यात आले.
जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या ओबीसी आरक्षण धोरणविरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार ओबीसी समाजाची राजकीय कारकीर्द समाप्त करण्याचे षडयंत्र आखत असल्याचा आरोप करण्यात आला. ओबीसी समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत जितेंद्र मोघे यांनी व्यक्त केले.
आंदोलनाची सुरुवात मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी देत झाली. ओबीसीत मोडणारा बारा बलुतेदार समाज, भोई, कुंभार, शिंपी, धोबी, लोहार यासारख्या समाजबांधवांच्या हस्ते मटके फोडून आंदोलनाची सुरुवात झाली. आंदोलनात जितेंद्र मोघे, बाळासाहेब शिंदे, मुबारक तंवर, डॉ. रामचरण चव्हाण, वामन नाईक, विजय राऊत, अशोक जगताप, राहुल देवतळे, दुलसिंग चव्हाणसह काँग्रेस तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.