ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 10:37 PM2018-09-04T22:37:02+5:302018-09-04T22:38:44+5:30

ऊस उत्पादकांनी येथील डेक्कन शुगरविरूद्ध सुरू केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस उजाडला. उर्वरित रक्कम मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. कारखाना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ऊस उत्पादकांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.

The movement of sugarcane growers continued | ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरूच

ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरूच

Next
ठळक मुद्देडेक्कन शुगरविरूद्ध संताप : दुसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळ : ऊस उत्पादकांनी येथील डेक्कन शुगरविरूद्ध सुरू केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस उजाडला. उर्वरित रक्कम मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. कारखाना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ऊस उत्पादकांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
या परिसरातील शेतकºयांनी डेक्कन शुगरला ऊस पुरविला. मात्र त्यांच्या हक्काचे पूर्ण पैसे मिळाले नाही. उर्वरित ४५० रुपये मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी कारखाना संचालकांना त्यांच्या कक्षातही डांबले होते. सोमवारी चर्चेसाठी बोलाविण्यात आले. मात्र कारखान्याकडून सक्षम अधिकारी पाठविले गेले नाही. पोलिसांनी शेतकºयांचा मोर्चा अडविला. त्यामुळे बेमुदत आंदोलनाची तयारी ऊस उत्पादकांनी दर्शविली आहे. पैसे मिळेपर्यंत प्रसंगी कारखाना क्षेत्रातच राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी आॅडिटर महंत (यवतमाळ) यांना बुधवार, ५ सप्टेंबर रोजी आॅडिटसाठी पाठविले जाईल, असे सांगितले. मात्र आॅडिटर पाठवू नये, असे शेतकºयांनी स्पष्टपणे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास लांडगे यांनी पुढील भूमिका जाहीर केली. तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करू, प्रसंगी सामूहिक आत्मदहन केले जाईल, असा इशारा दिला. दरम्यान आंदोलनकर्त्यांचे प्रश्न खासदार भावना गवळी, बाबासाहेब गाडे पाटील यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतले. यावेळी चंदू भारती, नीलेश भटबले, संजय पौळ, गजानन बहिरमकर, प्रवीण जयस्वाल, राजू आंबेकर आदी उपस्थित होते.

Web Title: The movement of sugarcane growers continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.