जिल्हा परिषद कर्मचाºयांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 10:22 PM2017-08-02T22:22:53+5:302017-08-02T22:25:48+5:30
जिल्हा परिषद कर्मचाºयांनी बुधवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचाºयांनी बुधवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी कामाच्या अति ताणामुळे आत्महत्या केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचाºयाला मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुणे विभागात विभागीय आयुक्तांनी ‘झीरो पेन्डन्सी’ व अभिलेख वर्गीकरण मोहीम सुरू केली. या मोहिमेत अभिलेख वर्गीकरण करणे अत्यंत जिकरीचे ठरले. कित्येक वर्षे जुने अभिलेखे वर्गीकरण करताना कर्मचाºयांना विविध समस्या येत आहे. यामुळे कामाचा ताण वाढला. याच ताणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केला. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, संलग्न संघटना आणि मित्र संघटनांनी बुधवारी काळ्या फिती लावून काम केले. दुपारी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आंदोलकांनी मौन पाळून गुरव यांना श्रद्धांजली अर्पण केली. नंतर मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन सादर करून या घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली.
या आंदोलनात कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, सरचिटणीस दिलीप कुडमेथे, संतोष मिश्रा, गजानन मडकाम, लिपीक संघटनेचे विभागीय संघटक मारोती जाधव, लेखा संघटनेचे गोविंद सावळकर, बाबा यादव, प्रशांत चुंबळे, सरिता लंगोटे, मंजुषा बोरगमवार, रेखा धुर्वे, सिद्धार्थ मानकर, दत्ता काळे, ताराचंद देवधरे, शिल्पा कोहाडे, माया खुळे, महादेव घटबळे, संदीप शिवरामवार आदींसह सर्व संवर्गातील जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी होते.