खासदार, आमदारांचा ‘वट’ यंत्रबंद
By Admin | Published: February 23, 2017 01:01 AM2017-02-23T01:01:13+5:302017-02-23T01:01:13+5:30
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता मिनी मंत्रालय कोण सर करणार, यावरून जिल्ह्यातील तीन
निकालाची उत्सुकता : मिनी मंत्रालय कोण सर करणार, विजयाचे दावे-प्रतिदावे सुरूच
रवींद्र चांदेकर यवतमाळ
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता मिनी मंत्रालय कोण सर करणार, यावरून जिल्ह्यातील तीन खासदार अन् १३ आमदारांचा ‘वट’ नागरिकांना कळणार अहे.
सर्व पक्ष, त्यांचे नेते, मंत्री, खासदार, आमदारांनी निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावून प्रचार केला. आपापल्या प्रभावक्षेत्रातील आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. काही गटांमध्ये राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचार सभा झाला. त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. आता या सर्व नेते, लोकप्रतिनिधींचा मतदारांवर किती प्रभाव पडला, हे जनतेला कळून चुकणार आहे.
मतदान पार पडताच सर्वच पक्ष विजयाचे दावे करीत सुटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही मुख्य पक्ष विजयाचा दावा ठोकत आहे. बहुमत आमचेच, असा घोषा त्यांनी लावला आहे. मात्र मतदार राजाने नेमका कुणाच्या बाजूने कौल दिला, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते उद्याच कळणार अोहे.
मतमोजणी पूर्णत्वास जातपर्यंत प्रत्येक पक्ष व नेते विजयाचे दावे करतील. मात्र उद्या सर्वांचीच पोलखोल होणार आहे. मतदारांनी नेमका काय कौल दिला, हे स्पष्ट होईल. तोपर्यंत सर्वच पक्ष, उमेदवार आणि नेते विजयाचे स्वप्न रंगवीत राहतील.
ग्रामीण मतदारांनी आपला हक्क बजावताना सर्व पक्ष व नेत्यांच्या आश्वासनांचा लेखाजोखा नजरेसमोर ठेवून कर्तव्य पार पाडले. त्यांना विजयाचा अदमासही आहे. मात्र मतदार राजा चुप्पी साधून आहे.
लोकप्रतिनिधींची कसोटी
४मतमोजणीअंती जिल्ह्याला लाभलेल्या तीन खासदार अन् १३ आमदारांचा वकूब जिल्ह्यातील जनतेला कळणार आहे. जिल्ह्याला तीन खासदार लाभले. विधानसभेचे सात व विधानपरिषदेचे तब्बल सहा आमदार लाभले. यात अहीर केंद्रात राज्यमंत्री आहे. तीन आमदार मदन येरावार, संजय राठोड व डॉ. रणजित पाटील राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री आहे. माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती आहेत. उर्वरित नऊ आमदारांमध्ये मनोहरराव नाईक, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, राजू तोडसाम, श्रीकांत देशपांडे, ख्याजा बेग, तानाजी सावंत आदींचा समावेश आहे. या लोकप्रतिनिधींचा जिल्ह्यात किती ‘वट’ आहे, हे मतमोजणी अंती दिसून येणार आहे.