महावितरणच्या पुसद विभागीय कार्यालयाचे विभाजन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:53+5:302021-07-05T04:25:53+5:30
पुसद विभागीय कार्यालयांतर्गत पुसद, दारव्हा, दिग्रस, नेर, महागाव, उमरखेड, ढाणकी हे उपविभाग आहेत. या विभागाचा भौगोलिक भूभाग व ग्राहकसंख्या ...
पुसद विभागीय कार्यालयांतर्गत पुसद, दारव्हा, दिग्रस, नेर, महागाव, उमरखेड, ढाणकी हे उपविभाग आहेत. या विभागाचा भौगोलिक भूभाग व ग्राहकसंख्या खूप मोठी असल्यामुळे पुसद विभागीय कार्यालयाचे विभाजन करणे आवश्यक आहे. पुसद विभागाचे विभाजन करून पुसद, उमरखेड, महागाव, ढाणकी या उपविभागाचे एक विभागीय कार्यालय व नेर, दारव्हा, दिग्रस, आर्णी अशा दुसऱ्या विभागीय कार्यालयाची आवश्यकता आहे. पुसद शहर वितरण केंद्राचे नवीन उपविभागीय कार्यालय व पुसदच्या ग्रामीण वितरण केंद्राचे विभाजन करून दुसरे नवीन उपविभागीय कार्यालय करण्याची आवश्यकता आहे.
याबाबत आमदार डॉ. वजाहत मिर्झा व आमदार इंद्रनील नाईक यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत महावितरणच्या महाव्यवस्थापकांनी २ जुलैच्या पत्रातून अमरावती विभागीय मुख्य अभियंत्यांना त्वरित माहिती सादर करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी दिली.