मुडाणाची १०० घरे पाडण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:24 PM2017-12-29T23:24:24+5:302017-12-29T23:24:34+5:30

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मुडाणा येथील घरांची भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्यांदा मोजणी केली. यामुळे शंभर घरे उद्ध्वस्त होण्याची भीती असून या मोजणीविरोधात गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

Mudana fears losing 100 homes | मुडाणाची १०० घरे पाडण्याची भीती

मुडाणाची १०० घरे पाडण्याची भीती

Next
ठळक मुद्देदुसऱ्यांदा मोजणी : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मुडाणा येथील घरांची भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्यांदा मोजणी केली. यामुळे शंभर घरे उद्ध्वस्त होण्याची भीती असून या मोजणीविरोधात गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या रस्त्यासाठी जमिनीची मोजणी गुरुवारी भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी केली. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा झालेल्या मोजणीच्या खुणा काढून टाकल्या. आता अंतर वाढविले असून थेट मुडाणा गावात या खुणा करण्यात आल्या आहे. यामुळे गावकरी धास्तावले असून कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून मोजणी करीत असल्याचे सांगितले. यानंतर गावकऱ्यांनी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना निवेदन दिले.
यावेळी प्रवीण जाधव, संतोष धुळे, नरेंद्र नप्ते, संदीप किवले, ओमप्रकाश किवले, विनायक कुबडे, मयूर काळे आदी उपस्थित होते. या मोजणीमुळे मुडाणा येथील १०० घरे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. मुडाणा गावात यापूर्वी मोजणी झाली होती. मात्र आता मोजणी करताना खुणा गावात आल्याने नागरिकांत विविध चर्चा सुरू आहे.

मुडाणा गावातील मोजणीचा कुठलाही आदेश भूमिअभिलेख विभागाला दिला नव्हता. झालेल्या प्रकाराची योग्य चौकशी केली जाईल.
- स्वप्नील कापडणीस
उपविभागीय अधिकारी, उमरखेड

Web Title: Mudana fears losing 100 homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.