मुडाणा, शेंबाळपिंपरीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:54 PM2018-07-26T21:54:45+5:302018-07-26T21:55:30+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी मुडाणा आणि शेंबाळपिंपरी येथे मराठ समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मुडाणा व शेंबाळपिंपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा/शेंबाळपिंपरी : आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी मुडाणा आणि शेंबाळपिंपरी येथे मराठ समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला व्यावसायीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे मुडाणा व शेंबाळपिंपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. यात काकासाहेब शिंदे यांनी बलिदात केले. त्यांना प्रथम मुडाणा येथील छत्रपती शिवाजी चौकात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधक एकत्रित आले. रामचंद्र तंबाखे, बाळासाहेब जाधव, गोलू काळे, अंबादास पाटील, अशोक वानखेडे, रमेश जाधव, कपिल जाधव, संदान वानखेडे, सुनील मुधोळ, तानाजी कदम, विनायक पाटील, गजानन चव्हाण, सुनील कदम, आकाश पानपट्टे, गजानन खंदारे, मारोती दांडेगावकर, दुलाजी पाटील, काशिनाथ पाटील, प्रवीण किवले, अमोल कदम, सूरज मादळे, महेंद येनकर, पांडुरंग भिमटे यांनी बंदसाठी पुढाकार घेतला. नंतर पोलीस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महागाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शेंबाळपिंपरी येथे सकाळी ९ वाजता मराठा समाजाने मोर्चा काढला. छत्रपती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तेथे आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे व जगन्नाथ सोनोने यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुनील पागिरे, शैलेश मेटकर, शैलेश वसपूरकर, अमोल जाधव, रामकृष्ण चंदेल, गजानन बोक्से, उपसभापती गणेश पागिरे यांनी विचार व्यक्त केले. नंतर मराठा सेवा संघाचे सुधीर देशमुख यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. खंडाळाचे ठाणेदार बी.आर. ठाकूर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात होती. बंददरम्यान कोणतीही अनूचित घटना घडली नाही. बससेवा पूर्णपणे बंद होती.
गुंजमध्येही बंद
आरक्षणाच्या मागणीसाठी गुंजमध्येही बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंदमध्ये सहभागी झाली होती. सायंकाळपर्यंत सर्व दुकाने बंद होती. गावात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.