नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्वसंमतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 09:33 PM2017-10-20T21:33:56+5:302017-10-20T21:34:06+5:30

पांढरकवडा नगरपरिषद अध्यक्षपदाचा भाजपाचा अधिकृत उमेदवार सर्वसंमतीने ठरणार असल्याचे या भागाचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यकर्त्यांच्या बैैठकीत सांगितले.

The municipal candidate's candidature is with the consent of the candidate | नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्वसंमतीनेच

नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्वसंमतीनेच

googlenewsNext
ठळक मुद्देहंसराज अहीर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा येथे कार्यकर्त्यांची बैैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषद अध्यक्षपदाचा भाजपाचा अधिकृत उमेदवार सर्वसंमतीने ठरणार असल्याचे या भागाचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यकर्त्यांच्या बैैठकीत सांगितले. येथील ग्रीनपार्क वसाहतीतील समाज मंदिरात प्रमुख कार्यकर्त्यांची बुधवारी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैैठक घेण्यात आली.
या बैठकीला आमदार राजू तोडसाम, भाजपाचे सर्व तालुका व शहर विभागाचे पदाधिकारी आणि ईच्छूक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी सुरूवातीला श्वेता बोरेले, विभा बोल्लेनवार, स्नेहा चिंतावार, अनुश्री वैद्य, गंधा बोकीलवार यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु आता आतिश बोरेले यांच्या पत्नी खुशी बोरेले यांचे नाव अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पुढे आले आहे. या शिवाय नगरपरिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा सुनंदा देशमुख यांनीही भाजपाची उमेदवारी मागितल्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सुनंदा देशमुख या पारवेकर गटातर्फे मागील निवडणुकीत निवडून आल्या होत्या. पारवेकर गटाच्या कोट्यातूनच त्यांना उपाध्यक्षपद देण्यात आले होते. परंतु आता त्यांनी अचानक भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे त्यांनी पारवेकर गटाला ‘रामराम’ ठोकल्याचे मानले जात आहे.
कार्यकर्त्यांची बैठक आटोपल्यानंतर ना. हंसराज अहीर यांनी ईच्छूक उमेदवार विभा बोल्लेनवार व खुशी बोरेले यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. सोबतच सुनंदा देशमुख यांच्या घरीसुद्धा त्यांनी भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नेमकी तिकीट कुणाला, याकडे पांढरकवडा शहराचे लक्ष लागले आहे.
बसपाची बैठक
नगरपरिषद निवडणुकीतील रणनिती तयार करण्यासाठी बसपानेही पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, पंडित दिघाडे, प्रा.वासुदेव शेंद्रे, शैलेश गाडेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: The municipal candidate's candidature is with the consent of the candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.