नगरपरिषदेने केला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:01 AM2019-03-09T00:01:40+5:302019-03-09T00:02:44+5:30

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने यवतमाळ नगरपरिषदेने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. यानिमित्त उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Municipal council honors talented women | नगरपरिषदेने केला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

नगरपरिषदेने केला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Next
ठळक मुद्देमहिला दिन : उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिर, गृहिणींसह अधिकारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने यवतमाळ नगरपरिषदेने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. यानिमित्त उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यशस्वी गृहिणी म्हणून सुधा अनिल पटेल, जिल्हा जातपडताळणी उपायुक्त जया राऊत, यवतमाळ गोग्रीन संकल्पनेच्या प्रमुख डॉ. वैशाली गिरीष माने, पत्रकार आरती दिनेश गंधे, यशस्वी उद्योजक सुनिता भगवान भितकर, अ‍ॅड. शिरीन फरहद खान, घरेलू कामगार संघटनेच्या अनिता मधुकर खुनकर, कल्पना सुभाष देशमुख, दिव्यांग क्षेत्रात काम करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रोशनी राय यांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी, उद्घाटक डॉ. स्रेहा सुरेंद्र भुयार, प्रमुख अतिथी म्हणून माया अनिल अढागळे, महिला बालकल्याण सभापती पुष्पा राऊत, नियोजन सभापती शुभांगी हादगावकर, शिक्षण सभापती अ‍ॅड. करूणा तेलंग, स्थायी समिती सदस्य लता ठोंबरे, बांधकाम सभापती विजय खडसे, विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी, उपमुख्याधिकारी ममता राठोड उपस्थित होत्या.

बचतगटाचे प्रदर्शन
शहरी महिलांनी स्थापन केलेल्या बचतगटातील विविध वस्तूंच्या प्रदर्शनीचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. दीनदयाल अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या माध्यमातून हे प्रदर्शन झाले. यात कलाकुसरीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते.

Web Title: Municipal council honors talented women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.