नगरपंचायतीच्या नगरसेवकांना ‘एमएलसी’साठी मतदानाचा हक्क
By admin | Published: November 28, 2015 03:19 AM2015-11-28T03:19:23+5:302015-11-28T03:19:23+5:30
नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विधान परिषदेत मतदान करता यावे म्हणून राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता.
अनेकांना लॉटरी : निवडणूक आयोगाचा आदेश धडकला
रूपेश उत्तरवार यवतमाळ
नगरपंचायतीच्या नगरसेवकांना विधान परिषदेत मतदान करता यावे म्हणून राज्य शासनाने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने हिरवी झेंडी दाखवली. यामुळे नगरपंचायतीमध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांना विधान परिषदेसाठी मतदान करता येणार आहे.
यापूर्वी विधान परिषदेसाठी जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या सदस्यांनाच मतदान करता येत होते. नवीन आदेशामुळे नगरपंचायतीच्या नगरसेवकांना मतदान करता येणार आहे. पूर्वी विधान परिषदेसाठी जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेचे २६८ मतदार मतदान करीत होते. नगर पंचायतीमधील नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने त्यामध्ये १०३ मतदारांची भर पडणार आहे. यामुळे विधान परिषदेत मतदान करण्यासाठी नवीन मतदारांना संधी मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव के. अजयकुमार यांनी याबाबतचा आदेश प्रसिद्ध केला आहे.