नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:00 AM2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:28+5:30
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांप्रमाणेच १०० टक्के वेतन अनुदान द्यावे, रोजंदारी कर्मचारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कायम करावे, सफाई कामगारांना पदोन्नती द्यावी, नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात पदनिर्मिती करावी, राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतमधील उद्घोषणा राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी आणि रोजंदारी कामगार यांच्या केंद्रीय कार्यकारिणीने राज्यातच एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील नगरपरिषद कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन करण्यात आले. यवतमाळ नगरपरिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी सोमवारी निदर्शने केली.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांप्रमाणेच १०० टक्के वेतन अनुदान द्यावे, रोजंदारी कर्मचारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कायम करावे, सफाई कामगारांना पदोन्नती द्यावी, नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात पदनिर्मिती करावी, राज्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायतमधील उद्घोषणा राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे द्यावी, ठेका पद्धत बंद करा यासह अनेक मागण्यांकरिता हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला. यावेळी यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी कर्मचाºयांशी चर्चा केली. डॉ. विजय अग्रवाल यांनी कोविड नियंत्रणाचे काम करणारे कर्मचारी कुठलीही गैरसोय न होता आंदोलन करतील अशी ग्वाही दिली. संचालन सुनील वासनिक यांनी केले. यावेळी राज्य संवर्ग संघटनेचे सचिव प्रशांत सूर्यवंशी होते. माजी आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
यशस्वीतेसाठी अभियंता महेश जोशी, प्रकाश मिसाळ, मनोहर गुल्हाने, दिनेश जाधव, के.डी. पवार, अजय गहरवाल, प्रफुल्ल जनबंधू, सुभाष ब्राम्हणे, सुनील नाईक, गोपाल शर्मा, अमोल पाटील, अशोक मिसाळ, विनोद दिवटे, लता गोंधळे, संगीता खोब्रागडे, वैशाली पाटील, सफाई कामगार संघटनेचे सुरेंद्र गोंधळे, सुशील चपेरिया, कुंवर गोंधळे, अजय तांबे, सावन ब्राम्हणे, रोहित मोगरे, सहदेव पाली, संजय साठे, बंडू कुमरे, ज्योतीराम इंगोले, आशिष लंगोट, संजय हरणखेडे, गिरीष गिरटकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.