'त्या' तरुणीची प्रेम प्रकरणातून हत्या; मादनी जंगलात थरार, एकाच वेळी चौघांवर प्रेम भोवले     

By सुरेंद्र राऊत | Published: July 9, 2023 07:11 PM2023-07-09T19:11:15+5:302023-07-09T19:11:38+5:30

अमर पांडुरंग राऊत रा. येरड बाजार ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती असे आराेपीचे नाव आहे.

Murder of that young woman in a love affair Thrilled in the Madani forest, fell in love with four at once | 'त्या' तरुणीची प्रेम प्रकरणातून हत्या; मादनी जंगलात थरार, एकाच वेळी चौघांवर प्रेम भोवले     

'त्या' तरुणीची प्रेम प्रकरणातून हत्या; मादनी जंगलात थरार, एकाच वेळी चौघांवर प्रेम भोवले     

googlenewsNext

यवतमाळ : शहरालगतच्या बाेरगाव डॅम परिसरातील मादनी जंगलात मुलीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सुरुवातील या मुलीची ओळख पटत नव्हती. ग्रामीण पाेलिसांनी तिच्या पालकांचा शाेध घेऊन ओळख पटविली. तिचा मृतदेह कुजल्याने शवचिकित्सा अहवाल येण्यास वेळ लागला. या अहवालानुसार त्या मुलीचा गळाआवळून खून झाल्याचे पुढे आले. याच दिशेने ग्रामीण पाेलिसांनी तपास सुरू केला. मात्र या प्रकरणात तळेगाव दशासर ता. चांदूर रेल्वे येथे अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने खुनाचा तपासही तळेगाव पाेलिसांकडे देण्यात आला. त्या मुलीची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून एका आराेपीला अटक केली आहे.

अमर पांडुरंग राऊत रा. येरड बाजार ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती असे आराेपीचे नाव आहे. त्याने ३ जुलै राेजी मुलीला साेबत घेतले. नंतर तिला दुचाकीवरून मादनी जंगलात आणले. तिथे तिच्यासाेबत वाद घातला. माझ्यासह इतर किती मुलांबरोबर प्रेमसंबंध आहेत, अशी विचारणा केली, यावरून वाद वाढत गेला. मुलीला मारहाण करून तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर आत्महत्येचा देखावा तयार करण्यासाठी गळफास लावून झाडाला लटकवले. या घटनेची माहिती आराेपी अमरने लगेच फाेनद्वारे आपल्या मित्राला दिली. मुलीचा मृतदेह मिळताच तळेगाव पाेलिसांनी तपासाला दिशा दिली. तात्काळ आराेपी युवकाला ताब्यात घेतले. त्याने अल्पवयीन मुलीसाेबत शिर्डी येथे जावून लग्न केले होते. त्यानंतर मुलीचे इतरांसाेबत असलेले संबंध त्याला माहिती झाले. यातूनच हत्या केल्याची कबुली आराेपी अमर राऊत याने पाेलिसांना दिली.

रविवारी मादनी येथे आराेपीचे प्रात्यक्षिक
मुलीची हत्या करणाऱ्या आराेपीला अमर राऊत याला घेऊन अमरावती पाेलिस रविवारी मादनी जंगलात पाेहाेचले. त्यांनी आराेपीकडून हत्येचे प्रात्यक्षिक त्याच्याकडून करवून घेतले. यावेळी अमरावती ग्रामीणचे अपर पाेलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी सुर्यकांत जगदाळे, तळगावे ठाण्यातील सहायक निरीक्षक रामेश्वर धाेंडगे,उपनिरीक्षक कपील मिश्रा यांच्यासह यवतमाळ ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक गाेपाल उताणे उपस्थित हाेते.
 

Web Title: Murder of that young woman in a love affair Thrilled in the Madani forest, fell in love with four at once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.