यवतमाळतील स्टेट बँक चौकात युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 10:41 PM2023-07-14T22:41:59+5:302023-07-14T22:42:21+5:30
Yawatmal News प्रचंड वर्दळ असणाऱ्या स्टेट बँक चौक येथे तीन युवकांनी धारदार चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री ९:४५ वाजता घडली.
यवतमाळ: शहरातील प्रचंड वर्दळ असणाऱ्या स्टेट बँक चौक येथे तीन युवकांनी धारदार चाकूने हल्ला करून एका 25 वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री ९:४५ वाजता घडली.
चेतन बाबाराव चित्रिव असे मृत युवकाचे नाव आहे. तो उमरसरा भागातील जगत मंदिर जवळ किरायाची रूम घेऊन राहत होता. चेतनचा खून नेमका कशातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. चेतनला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यवतमाळ शहरातील कायदा व सुव्यवस्था गंभीर बनली आहे. सातत्याने खूनाच्या घटना घडत आहेत.
दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या वादातून रोशन मस्के यांचा खून झाला. यातील मुख्य सूत्रधार अजूनही अटक नाही. तोच आता भर चौकातील खुनाचा तपास करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चेतन चित्रिव याला तिघांनी चाकूने भोकसल्याचे अनेकांनी पाहिले आहे, भर रस्त्यात सर्वसामान्य नागरिकांसमोर खुनाच्या घटना घडत असल्याने यवतमाळकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्टेट बँक चौकातील खुनाच्या प्रत्यक्ष दर्शिकडून शहरातील एकूणच स्थितीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.