अनैतिक संबंधाच्या संशयातून वर्षभरापूर्वी झालेला खून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 05:00 AM2022-02-25T05:00:00+5:302022-02-25T05:00:41+5:30

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलीस पथकांनी वसंतनगर, काळीदौलत, पुणे, नागपूर, सोलापूर अशा विविध ठिकाणांवरून गुन्ह्यातील आरोपींची धरपकड केली. यातील मुख्य आरोपी नितीन लक्ष्मण शास्त्रकार याला नागपुरातून ताब्यात घेतले. सोबतच त्याला खुनात मदत करणारी त्याची पत्नी, वडील लक्ष्मण परसराम शास्त्रकार, भाऊ चेतन, मित्र देवानंद उर्फ देवा देवराव वाघमारे (रा. काळीदौलत खान), प्रमोद दारासिंग राठोड यांना अटक केली. 

Murder over a year ago revealed on suspicion of immoral relationship | अनैतिक संबंधाच्या संशयातून वर्षभरापूर्वी झालेला खून उघड

अनैतिक संबंधाच्या संशयातून वर्षभरापूर्वी झालेला खून उघड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील वसंतनगर येथील ५१ वर्षीय व्यक्ती मार्च २०२१ पासून बेपत्ता होती.  अनैतिक संबंधाच्या संशयावरून नात्यातीलच व्यक्तीने त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी वर्षभरानंतर गुरुवारी सहा आरोपींना सबळ पुराव्यासह अटक केली. 
श्रावण उर्फ विठ्ठल परसराम शास्त्रकार (५१) हे ९ मार्च २०२१ रोजी घरून बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईलही बंद होता. या प्रकरणी मुरलीधर परसराम शास्त्रकार यांनी मोठा भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिग्रस पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी मुरलीधर शास्त्रकार यांना त्यांच्या भावाचे नात्यातीलच व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती मिळाली. याची तक्रार घेऊन शास्त्रकार यांनी पाेलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची भेट घेतली. अधीक्षकांनी या प्रकरणात संगनमताने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले व याचा तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी दारव्हा आदित्य मिरखेलकर यांच्याकडे सोपविला. सोबत चार पोलीस पथके तपासकामी लावली. या प्रकरणात पहिले संशयित म्हणून चेतन लक्ष्मण शास्त्रकार व लक्ष्मण परसराम शास्त्रकार या पिता-पुत्रांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलीस पथकांनी वसंतनगर, काळीदौलत, पुणे, नागपूर, सोलापूर अशा विविध ठिकाणांवरून गुन्ह्यातील आरोपींची धरपकड केली. यातील मुख्य आरोपी नितीन लक्ष्मण शास्त्रकार याला नागपुरातून ताब्यात घेतले. सोबतच त्याला खुनात मदत करणारी त्याची पत्नी, वडील लक्ष्मण परसराम शास्त्रकार, भाऊ चेतन, मित्र देवानंद उर्फ देवा देवराव वाघमारे (रा. काळीदौलत खान), प्रमोद दारासिंग राठोड यांना अटक केली. 
आरोपी नितीनने खुनाची कबुली देताना पोलिसांपुढे धक्कादायक खुलासा केला. श्रावण परसराम शास्त्रकार यांचे कुटुंबातील महिलेशी अनैतिक संबंध होते. या धक्क्याने काका गोपाल यांचा मृत्यू झाला. त्यामुळेच त्यांचे अपहरण करून खून केल्याचे नितीनने सांगितले. ९ मार्च २०२१ रोजी श्रावण शास्त्रकार यांना दुचाकीवर बसवून काळीदौलत खान येथे आणले व निर्जनस्थळी त्यांची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर शेतालगतच्या नाल्यातील खोलगट भागात मृतदेह पुरला. आरोपीच्या या कबुलीनंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला. ते प्रेत श्रावण उर्फ विठ्ठल शास्त्रकार यांचे असल्याचे सिद्ध झाले. दिग्रस पोलिसांनी गुन्ह्यामध्ये कलम ३०२, १२० ब, २०१ यांची वाढ केली. 

  तपास पथकाला २५ हजारांचे पारितोषिक 
- वर्षभरापूर्वी झालेला खून उघड करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, दिग्रस ठाणेदार पांडुरंग फाडे, सहायक निरीक्षक विजयरत्न पारखी, विवेक देशमुख, सायबर सेलचे अमोल पुरी, उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, नरेंद्र मानकर, दोडके, जमादार सर्जु चव्हाण, श्रावण राऊत, सचिन राऊत, अविनाश गोदमले, अक्षय ठाकरे, प्रमोद इंगोले, अनुप मडके, आशिष महेंद्र, बबलू चव्हाण, पंकज पातुरकर, मोहंमद भगतवाले, सलमान शेख, प्रदीप दळवी, जितेंद्र चौधरी, सायबर सेलचे कविश पाळेकर, प्रगती कांबळे यांनी परिश्रम घेतले. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी रोख २५ हजारांचे पारितोषिक, सीनोट, जीएसटी असे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले आहे.

पुण्याकडे जाताना रस्त्यातच केली अटक 
- आरोपींना पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे काळीदौलत खान येथील देवा व प्रमोद राठोड हे दोन आरोपी पुणे येथे पसार होण्यास निघाले. स्थानिक गुन्हे शाखा पथक त्यांच्या मागावर असल्याने मेहकर पोलिसांच्या मदतीने अर्ध्या रस्त्यातच या दोघांना ताब्यात घेतले. याच पद्धतीने नितीन व त्याची पत्नी यांंनाही नागपुरातून पाळत ठेवून उचलले.

 

Web Title: Murder over a year ago revealed on suspicion of immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.