दिग्रसमध्ये मुस्लीम बांधवांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 09:27 PM2017-09-16T21:27:06+5:302017-09-16T21:27:21+5:30
म्यांनमारमध्ये सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहाराचा येथील मुस्लीम बांधवांनी जाहीर निषेध केला. काजी मौलाना अबू जफर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : म्यांनमारमध्ये सुरू असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहाराचा येथील मुस्लीम बांधवांनी जाहीर निषेध केला. काजी मौलाना अबू जफर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या या निवेदनात रोहिंग्या मुस्लिमांचा नरसंहार थांबविण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच संयुक्त राष्ट्र संघात हा मुद्दा रेटावा, अशी विनंती करण्यात आली. शहरातील मुख्य जामा मस्जिद व इतर मस्जिदीमधील हजारो मुस्लीम बांधवांनी मूक मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर धडकून तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन दिले.
काजी मौलाना अबू जफर यांच्या नेतृत्वात काढण्यात या मूक मोर्चात हाजी शौकत अली मलनस, पालिकेचे शिक्षण सभापती सैयद अकरम, हाजी शहजाद पहेलवान, मुहम्मद जाफर, मिर्जा अफजल बेग, समीर पटेल, मुहम्मद जसीम मौलाना, आमद धारीवाला, अॅड. ताज मलनस, सलीम चौहान, अरबाज धारिवाला, कादर नागानी, हफीज पटेल, मुहम्मद सादिक, रहीम रिजवी, मुहम्मद खिजर, जमीर खान, फयाज मलनस, आसिफ खान, रमजान ताज कव्वाल, इमरान खान, वसीम रिजवी, साहेब खान, मुहम्मद आसिफ, सलीम सौदागर, मुहम्मद इश्तीयाक, जावेद खान, जाकिर मलनस आदींसह मुस्लीम बांधव सहभागी होते.