‘त्या’ पुस्तकाचा पुसदच्या मुस्लीम समाजातर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:14+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, नेतृत्व जगजाहीर आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व जातीचे नागरिक सुखी व संपन्न होते. त्यामुळे त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी होऊच शकत नाही, असा दावा या संघटनांनी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांना दिलेल्या निवेदनातून केला.

Muslim community condemns 'that' book | ‘त्या’ पुस्तकाचा पुसदच्या मुस्लीम समाजातर्फे निषेध

‘त्या’ पुस्तकाचा पुसदच्या मुस्लीम समाजातर्फे निषेध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : जय भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचा येथील मुस्लीम समाज व संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. सदर पुस्तक त्वरित मागे घेऊन लेखकाने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, नेतृत्व जगजाहीर आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व जातीचे नागरिक सुखी व संपन्न होते. त्यामुळे त्यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी होऊच शकत नाही, असा दावा या संघटनांनी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांना दिलेल्या निवेदनातून केला. या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही निव०ेनातून करण्यात आली. यावेळी खान मोहम्मद खान सनी, सय्यद इश्तियाक, बाबा मिर्झा, अमजद खान नजीर खान, मुजीब बागवान, फिरोज खान, नन्ने खान, अब्दुल रहेमान चव्हाण, अ. हमीद शेख, शेख आहद, शेख निसार, शोएब इकबाल, शेख जमाल आदींसह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Muslim community condemns 'that' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.