लोकन्यायालयात आपसी तडजोड
By admin | Published: August 9, 2014 01:27 AM2014-08-09T01:27:32+5:302014-08-09T01:27:32+5:30
‘न्याय आपल्या दारी’, या संकल्पने अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा ...
मारेगाव : ‘न्याय आपल्या दारी’, या संकल्पने अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघातर्फे कुंभा ग्र्रामपंचायतीच्या सहकार्याने कुंभा येथील सांस्कृतिक भवनात फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक प्रबोधन शिबिर घेण्यात आले़
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मारेगाव दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम़आऱदेवकते होते़ प्रमुख पाहुणे म्हणून अॅड़परवेज पठाण, पंचायत समिती सदस्य गजानन खापने, सरपंच प्रेमकुमार खुराणा, रामदास घोटेकर, देवाजी गोहणे, पोलीस पाटील रामचंद्र मेश्राम उपस्थित होते़ याप्रसंगी न्यायाधीश देवकते आणि अॅड़पठाण यांनी महिलाविषयक कायदे, कौटुंबिक हिंसाचार, पोटगी, कूळ कायदा, शेत-जमीनीचे वाद, वारस हक्क, अशा विविध कायद्यांची माहिती देऊन सामान्यांसाठी तालुका स्तरावर असणाऱ्या मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला समितीची माहिती दिली़ लोकन्यायालयात आपली न्यायप्रविष्ट प्रकरणे तडजोडीने सोडविण्याचे आवाहन केले़
यानंतर द्वितीय सत्रात लोकन्यायालयात न्यायाधीशांसमोर ठेवलेल्या २९ प्रकरणांपैकी १९ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करून १० हजार रूपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला. संचालन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अण्णाभाऊ कचाटे यांनी केले़ फिरते लोक अदालत व शिबिराच्या यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्याम गरूड, सी़टी़ वानखडे, पी़पीख़डसन, आऱएम़ लोढे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी अविनाश शेंडे, प्रभाकर किनाके, अरूण सोनुले, अंगणवाडी सेविका बेबी मत्ते, प्रतिभा नागभिडकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)