मधमाशांपासून बचाव करताना तलावात बुडून मायलेकाचा मृत्यू

By admin | Published: August 24, 2016 12:50 AM2016-08-24T00:50:03+5:302016-08-24T00:50:03+5:30

मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली.

Myelaka dies drowning in a lake while protecting from bees | मधमाशांपासून बचाव करताना तलावात बुडून मायलेकाचा मृत्यू

मधमाशांपासून बचाव करताना तलावात बुडून मायलेकाचा मृत्यू

Next

नांझाची घटना : एक जण अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार सुरू
कळंब : मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. कांताबाई किसन मसराम (५५), श्याम किसन मसराम (३५) अशी मृतांची नावे आहेत. रामभाऊ देवबा मसराम (५०) हे जखमी झाले.
सदर तिघे शेतात खत देत होते. त्याचवेळी मधमाशांचा घोळका शेतात शिरला. तिघांवरही त्यांनी हल्ला चढविला. यातून सुटका करण्यासाठी रामभाऊ हा दूरवर जावून थांबला. मात्र कांताबाई आणि श्याम या दोघांनी शेतालगतच असलेल्या तलावात उडी घेतली. मात्र दोघेही गाळात फसल्याने मृत्यू पावले. जखमी रामभाऊला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कांताबाई किसन मसराम (५५), त्यांचा मुलगा श्याम किसन मसराम (३५) व नातेवाईक रामभाऊ देवबा मसराम (५०) यांचे नांझा शिवारात तीन एकर शेत आहे. हे तिघेही मंगळवारी सकाळी ६ वाजता पिकांना खत देण्यासाठी घरून निघाले. खत देत असताना सकाळी ९ वाजताच्या सुमारास दुसरीकडून उडत आलेल्या मधमाशांनी तिघांवरही अचानकपणे जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तिघे घाबरले.
या हल्ल्यातून वाचण्यासाठी कांताबाई व श्याम मसराम यांनी जवळच असलेल्या छोट्याशा तलावातील पाण्यात उडी घेतली. तलावातील पाण्यात बुडाल्यानंतरही मधमाशांनी हल्ला सुरूच ठेवला. त्यामुळे मायलेकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. रामभाऊ मसराम यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. परंतु मधमाशांच्या हल्यात तेही जखमी झाले. याप्रकरणीची कळंब पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मशमाशांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकामुळे शोककळा पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Myelaka dies drowning in a lake while protecting from bees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.