घाटातील खुनाचे रहस्य उलगडले

By Admin | Published: January 26, 2017 01:03 AM2017-01-26T01:03:17+5:302017-01-26T01:03:17+5:30

दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात गळा चिरून केलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचे रहस्य उलगडले असून भावाच्या मृत्यूचा बदला ....

The mysteries of the valley were revealed | घाटातील खुनाचे रहस्य उलगडले

घाटातील खुनाचे रहस्य उलगडले

googlenewsNext

युवराज मस्केचा खून सुडातून : दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक
पुसद : दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात गळा चिरून केलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचे रहस्य उलगडले असून भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खून केल्याचे पुढे आले. या प्रकरणी दोन सख्ख्याभावांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
संतोष काशीनाथ काळे (३७), केतन काशीनाथ काळे (२७) दोघेही रा.मंगलमूर्तीनगर, पुसद आणि मनोज मदनसिंग परिहार (३२) रा.पुसद अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात उमरखेड येथील युवराज धनराज मस्के (३०) याचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास जारी केला. यात सदर खून भावाची हत्त्या केल्याने झाल्याचे उघडकीस आले. यातील आरोपी संतोष व केतन काळे यांचा मोठा भाऊ नितीन काशीनाथ काळे हा २००६ मध्ये उमरखेड येथे मस्के यांच्या घरी राहात होता. त्यावेळी नितीनने विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. नितीनला युवराजची आई चंदाबाई मस्के हिनेच विष पाजल्याचा रोष संतोष व केतनच्या मनात होता.
दरम्यान, चंदाबाई पतीपासून विभक्त होऊन पुसद येथे राहात होती. तेथे युवराज आपल्या आईला भेटण्यासाठी अधून-मधून येत होता. रविवार, २२ जानेवारी रोजी युवराज मस्के पुसदला आला होता. त्यावेळी आरोपी संतोष व केतन आणि मनोज परिहार यांनी बदला घेण्याच्या दृष्टीने युवराजला सकाळी १० वाजता एका वाईन बारमध्ये नेले. तेथे येथेच्छ दारू ढोसली. मनोज परिहारसोबत वाद झाला. या वादात मनोजने युवराजच्या डोक्यात ग्लास मारला. त्यानंतर मद्यधुंद झालेल्या युवराजला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण घाटात नेले. तेथे संतोष व मनोजने युवराजचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. त्यानंतर मोहीम फत्ते झाले की नाही, हे पाहण्यासाठी केतन दुचाकीने घटनास्थळावर गेला. युवराज मृत झाल्याचे पाहून तिघेही दिग्रसला दुचाकीला पसार झाले, अशी माहिती अटकेतील आरोपींनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनंजय जगदाळे, पुसद शहर डीबी पथक आणि वाहतूक शाखा तपास करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The mysteries of the valley were revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.