खेड्यात वाघाच्या दहशतीचे गूढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 09:54 PM2018-12-02T21:54:45+5:302018-12-02T21:56:29+5:30

जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

The mystery of the tiger's scope in the village | खेड्यात वाघाच्या दहशतीचे गूढ

खेड्यात वाघाच्या दहशतीचे गूढ

Next
ठळक मुद्देवनविभाग संभ्रमात : सोशल मीडियावर व्हिडीओंचा भडीमार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. अनेक ठिकाणी तडसालाच वाघ समजून शेतशिवार ओस पडत आहेत. अवनी नरभक्षक वाघिणीच्या खात्म्यानंतर वाघ इतरत्र दिसल्याच्या अफवांना मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळत आहे.
निसर्गाने जिल्ह्याला समृद्ध अशी वनसंपदा दिली आहे. ७० ते ८० च्या दशकात अगदी कोणत्याही खोरीत वाघ राहत असल्याचे ज्येष्ठांकडून ऐकायला मिळत होते. आता पुन्हा त्याच चर्चा प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. कोणत्याही शेतशिवारात जंगलता फिरताना वाघ दिसल्याची चर्चा कमी अधिक प्रमाणात रंगत आहे. वाघांची संख्या वाढल्याने त्यांनी अधिवास क्षेत्रात वाढ केल्याचे काही वन्यजीवप्रेमी सांगतात. प्रत्यक्ष वाघामुळे सध्या तरी ग्रामीण जीवन ढवळून निघाले आहे. एखाद्याने वाघ दिसला असे सांगितले की, किमान दोन दिवस त्या परिसरात कोणी फिरकत नाही. यामुळे शेतीची कामे, रोजमजुरी बुडत आहे. घनदाट जंगलात राहणारा वाघ अचानक गावालगतच्या झुडपी जंगलात दिसल्याचा दावा केला जातो.
यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, पिंप्री (लासिना), बोरजई, नारकुंड, उमर्डा नर्सरी परिसरात वाघ असल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र वनविभागाच्या हाती कोणताच पुरावा लागलेला नाही. तरीही दक्षता म्हणून वाघाचे अधिवास असल्याचे फलक येथे वनविभागाने लावले आहे. अशीच स्थिती आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसराची आहे.
झरी, पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी, कळंब तालुक्यातील नांझा परिसरात वाघाचा संचार असण्याला वनविभागाने दुजोरा दिला आहे. तेथे काही वन्यजीव प्रेमी ‘रुट लेव्हल’वर काम करत आहे. असेच प्रयत्न वाघ दिसल्याच्या वावड्या उठलेल्या भागात होण्याची आवश्यकता आहे. यासाठी वनविभागाच्या यंत्रणेलाही प्रशिक्षित करण्याची गरज आहे. वनरक्षक, वनचौकीदार यांचा ग्रामस्थांशी थेट संपर्क होतो. अफवा का असे ना, त्याची शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातूनच वाघाच्या दहशतीचे गुढ उकलता येईल.
वन विभागाला हवेत पुरावे, गावकरी हतबल
वाघ आहे हे मान्य करण्यासाठी वनविभागाला पुरावे हवे आहेत. पायाचे ठसे (पगमार्क), त्याचे केस व इतर काही खानाखुणा हव्यात. मात्र या गोळा कशा करायच्या याबाबत ग्रामस्थांना कोणतीच माहिती नाही. काही ठिकाणी तर वाघाने शिकार केल्यानंतर ती ओढून परत आणली जाते किंवा जमिनीत पुरली जाते. वाघ असेल तर या कृत्यामुळे तो अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Web Title: The mystery of the tiger's scope in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ