यवतमाळात ‘नानीबाई का मायरा’
By admin | Published: January 12, 2016 02:19 AM2016-01-12T02:19:59+5:302016-01-12T02:19:59+5:30
पोस्टल मैदानावर ‘नानीबाई का मायरा’ या कृष्णलीला कथेचे प्रवचन राधास्वरुपा जयकिशोरीजी यांच्या वाणीतून १५ ते १७ जानेवारीपर्यंत होत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यवतमाळ : पोस्टल मैदानावर ‘नानीबाई का मायरा’ या कृष्णलीला कथेचे प्रवचन राधास्वरुपा जयकिशोरीजी यांच्या वाणीतून १५ ते १७ जानेवारीपर्यंत होत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
कथापर्वासाठी जीणमाता सेवा समितीच्या वतीने श्रीकृष्ण धाम साकारण्यात आले आहे. श्रीकृष्णलीलेतील एक भाग ‘नानीबाईका मायरा’ कथापर्वात सादर होणार आहे. १० हजार भाविक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नानीबाईसोबत २५ व्यक्तींचा संगीत संच राहील. यावेळी अखिल भारतीय वैष्णव चातुर्मास खालसा समितीचे अध्यक्ष रामलखनदास महाराज, नवलकिशोर खेतान, संजय अग्रवाल, विजय अग्रवाल, कैलाश बानुडे, राजेंद्र निमोदिया, जितेंद्र चोखाणी, मनोज जोगाणी, ललित गोकुलका, कैलास खेतान, सुरेंद्र जयपुरिया, घनश्याम बागडी, पुरूषोत्तम भरतीया, राजेश कोठारी, राजकुमार अग्रवाल, विजय खोरिया, मनोज सिंघानिया, राजेश राठी, अरूण सिंघानिया उपस्थित होते. (शहर वार्ताहर)