नाबार्डने तूर व चणा खरेदी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:33 PM2018-04-20T23:33:10+5:302018-04-20T23:33:10+5:30
तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन नाबार्डने तूर व चणा खरेदी करावा, अशी मागणी केली आहे. नाबार्डतर्फे यापूर्वी खरेदी सुरू करण्यात आली होती. परंतु शासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे खरेदी थांबली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन नाबार्डने तूर व चणा खरेदी करावा, अशी मागणी केली आहे.
नाबार्डतर्फे यापूर्वी खरेदी सुरू करण्यात आली होती. परंतु शासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे खरेदी थांबली. माल ठेवण्यासाठी गोदाम नसणे आणि बारदाणाचा तुटवडा आदी कारणे यासाठी सांगितली गेली. तालुक्यात चार हजार शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. कार्यप्रसंग, बँकेचे कर्ज, आरोग्य आदी बाबींमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत शेतमाल खरेदी करून चुकारे त्वरित द्यावे, अशी मागणी केली. निवेदन देताना काँगे्रस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनायक भेंडे, पंजाबराव खोडके, राजेंद्र माहुरे, राजेंद्र चिरडे, बाशिद खान, सदाशिव गावंडे, अनिल चव्हाण, विजया सांगळे, मो. राजिक मो. सादिक, शहबाज कलाम, अन्सार खाँ पठाण, मोहन खोडके, विनोद पाटमासे, वैभव बगमारे, रत्नाबाई मिसळे, वजेंद्र मानेकर, धनंजय वानखडे, संतोष सोनडवले आदी उपस्थित होते.