तुंबलेली नाली मोकळी करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:43 AM2021-03-17T04:43:08+5:302021-03-17T04:43:08+5:30

(फोटो) महागाव : प्रभाग एकमध्ये गटार तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाचा ६० महिन्यांचा कार्यकाळ झाल्यानंतरही हे ...

Nagar Panchayat administration unable to clear blocked drains | तुंबलेली नाली मोकळी करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ

तुंबलेली नाली मोकळी करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ

Next

(फोटो)

महागाव : प्रभाग एकमध्ये गटार तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाचा ६० महिन्यांचा कार्यकाळ झाल्यानंतरही हे गटार आहे त्या स्थितीत आहे.

सिमेंट नाली बांधकाम आहे. परंतु काही उपयोगाचे नाही. कारण पाणी जाण्यास मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. सांडपाणी काढून देण्यास नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. यासंदर्भात अनेकांनी तोंडी व लेखी सूचना दिल्या. परंतु गांभीर्याने पाहिले गेले नाही.

दाट वसाहत असलेल्या ठिकाणी निर्माण केलेल्या गटाराची अद्याप उपसणी झाली नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी अर्धा कोटी खर्ची घालूनसुद्धा महागाव नगरपंचायत प्रशासन या कार्यात असफल आहे. आगामी निवडणुकीत हा कळीचा मुद्दा असणार, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी वास्तव्यास असलेले नागरिक देत आहेत.

कोट

अनेक वर्षांपासून आम्ही याठिकाणी नरकयातना भोगत आहोत. एक वेळ माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे यांच्या प्रयत्नातून ही नाली मोकळी करण्यात आली. परंतु काही दिवसातच परत नाली तुंबली.

- नानाभाऊ पतंगे, महागाव.

गटाराला लागून बांधलेली सिमेंट नाली शोभेची वस्तू ठरू पाहात आहे. शासनाचा निधी वायफळ गेला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रशासकांनी या बाबींवर लक्ष घालून नाली मोकळी करून द्यावी.

- बळीराम राठोड, महागाव

काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नाली मोकळी करण्यास अडचणी निर्माण झाल्याने हा विषय प्रलंबित राहिला. पुढील काळात यासाठी पुढाकार घेऊ.

- उदय नरवाडे, माजी उपनगराध्यक्ष

Web Title: Nagar Panchayat administration unable to clear blocked drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.