नागपुरातील वीज अभियंत्यांच्या यवतमाळात धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:04+5:30

यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारपासून या भरारी पथकाने वीज चोरांविरुद्ध आपली धडक मोहीम सुरू केली आहे. पुढील पाच दिवस हे पथक मुक्कामी राहणार आहे. या पथकामध्ये नागपूर, भंडारा व अन्य जिल्ह्यातील तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे. अशी वेगवेगळी पथके जिल्हाभर तपासणी मोहिमेवर रवाना झाली आहेत. यवतमाळात सकाळपासून हे धाडसत्र सुरू झाले.

Nagpur power engineers rally in Yavatmal | नागपुरातील वीज अभियंत्यांच्या यवतमाळात धाडी

नागपुरातील वीज अभियंत्यांच्या यवतमाळात धाडी

Next
ठळक मुद्देभरारी पथके दाखल : वीज चोरी, सदोष विद्युत मीटरची तपासणी, पाच दिवस राहणार मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. स्थानिक पातळीवर त्याला आळा घालण्यात पूर्णत: यश न आल्याने आता वीज महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने ही मोहीम मंगळवारपासून हाती घेतली. नागपूर, भंडारा व अन्य जिल्ह्यातील वीज अभियंत्यांचा समावेश असलेल्या या पथकाने मंगळवारी अनेक ठिकाणी धाडी घालून वीज चोरी पकडली.
वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वीज पुरवठा होतो. मात्र तेवढ्या अपेक्षित रकमेची वीज बिलातून वसुली होत नाही. अर्थात अनेक ठिकाणी विजेची चोरी होत असल्याचे त्यातून सिद्ध होते. कित्येकदा वीज गळतीच्या नावाखाली ही चोरी दडपली जाते. आपली निष्क्रीयता उघडी पडू नये म्हणून अनेकदा त्याला विद्युत यंत्रणेतूनही हातभार लावला जातो.
यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारपासून या भरारी पथकाने वीज चोरांविरुद्ध आपली धडक मोहीम सुरू केली आहे. पुढील पाच दिवस हे पथक मुक्कामी राहणार आहे. या पथकामध्ये नागपूर, भंडारा व अन्य जिल्ह्यातील तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे. अशी वेगवेगळी पथके जिल्हाभर तपासणी मोहिमेवर रवाना झाली आहेत. यवतमाळात सकाळपासून हे धाडसत्र सुरू झाले. आर्णी रोड, अनेक सोसायट्या व काही कॉलन्यांमध्ये या धाडी घातल्या गेल्या. वीज पथक आल्याचे कळताच एका तीन मजली इमारतीच्या मालकाने घराला कुलूप लावून पोबारा केल्याचीही चर्चा आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अनेक गावात व गावाशेजारी वसलेल्या वस्त्यांमध्ये सर्रास वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारांवर आकोडे टाकून वीज पुरवठा घेतला जातो. घरगुती वापरासाठीच नव्हे तर शेती व शेतीविषयक अन्य कामांसाठी सर्रास ही चोरीची वीज वापरली जाते. विद्युत यंत्रणेच्या डोळ्यादेखत व मुख्य मार्गांच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गावांमध्ये राजरोसपणे हा प्रकार पहायला मिळतो. मात्र तेथे अशा ग्राहकांची संख्या अधिक असल्याने व हल्ले होण्याच्या भीतीने त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
कधी धाडस दाखविलेच तर कारवाई करू नका म्हणून राजकीय नेत्यांचे अभियंत्यांना फोन येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे वीज कंपनी स्थानिक पातळीवर अशी मोहीम राबविणे टाळते. बाहेर जिल्ह्यातून आलेले वीज अभियंत्यांचे भरारी पथक अशा वीज चोरांच्या वस्त्यांवर धाडी घालते की प्रतिष्ठीतांच्या एरियात ‘फेरफटका’ मारुन केवळ ‘खानापूर्ती’ करते याकडे लक्ष लागले आहे. भरारी पथकांच्या या धाडीबाबत महावितरणच्या स्थानिक यंत्रणेकडून मात्र गोपनीयता पाळली जात आहे, हे विशेष!

हल्ल्याच्या भीतीने वादग्रस्त वसाहतीत अभियंते जातच नाहीत !
विद्युत उपकरणे अधिक, वापरही भरपूर आणि विद्युत देयक मात्र नाममात्र येणाऱ्या वीज ग्राहकांची यादी महावितरण कंपनीने तयार केली आहे.
जिल्ह्यातील अभियंत्यांना अशा ग्राहकांकडे धाडी घालून वीज चोरी पकडण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यांनी काही प्रमाणात प्रयत्नही केले.
परंतु वादग्रस्त एरियात जाणे ही यंत्रणा टाळते. कारण तेथे हल्ला होण्याची भीती असते.
कित्येकदा पोलिसांना सोबत घेऊन धाडी घातल्या जातात. परंतु प्रत्येक वेळी पोलीस बंदोबस्ताचा खर्च परवडत नाही. म्हणून मग वादग्रस्त भागात धाडी टाकायला जाणेच टाळले जाते.
नियम व शासकीय यंत्रणेचा सन्मान करणाºया रहिवासी एरियात जाऊन आणि कारवाई करून मग वीज कंपनीची यंत्रणा आपला ‘परफॉर्मन्स’ दाखविते.
स्थानिक यंत्रणेच्या नजरेतून सुटलेल्या व विविध कारणांनी जाणीवपूर्वक सोडलेल्या वीज चोºया पकडण्याचे काम आता भरारी पथक करणार आहे.

Web Title: Nagpur power engineers rally in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज