दुष्काळ मुक्तीसाठी नमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:08 PM2019-06-05T22:08:27+5:302019-06-05T22:09:06+5:30

रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.

Namaz for the release of drought | दुष्काळ मुक्तीसाठी नमाज

दुष्काळ मुक्तीसाठी नमाज

Next
ठळक मुद्देरमजान ईद : देशात शांती, सुरक्षा, एकतेसाठी प्रार्थना, पोलिसांकडून गुलाबपुष्प भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.
दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती निर्माण झाली. सततच्या दुष्काळाने राज्यात पाच हजार टँकरच्या मदतीने पाणी वितरण केले जात आहे. अनेक गावांची तहान केवळ टँकरवरच अवलंबुन आहे. राज्यात भीषण स्थिती आहे. अशात पावसाळा लांबण्याचे संकेत हवामान खात्याने दिले. स्थिती अधिक बिकट होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदच्या पर्वावर संपूर्ण देशभरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून विशेष नमाज अदा केली. यावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी मुबलक पावसासाठी अल्लाहला साकडे घालण्यात आले.
येथील जामा मस्जीदचे इमाम मुफ्ती महंमद जाफीर कासमी यांच्या नेतृवात मुस्लीम समाज बांधवांनी नमाज अदा केली. देशात शांतीची प्रार्थना केली. रमजान ईदनिमित्त कळंब चौकात पोलीस बांधवांनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प भेट दिले. यातून एकतेचा संदेश दिला. यवतमाळसह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरासह जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.

बाभूळगाव येथे ईद साजरी
बाभूळगाव : पवित्र रमजान महिन्यानंतर येणारी रमजान ईद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शांतता समितीचे सदस्य आणि पोलीस विभागातर्फे मुस्लीम बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ईदगाहमध्ये नमाज पठन करून येणाऱ्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेदार सतीश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, प्रकाशचंद छाजेड, सहायक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख, प्रवीण तातेड, बल्लू जगताप, प्रकाश रत्ने, एच.पी. ठाकरे आदींनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

जकातने दिला अनेकांना मदतीचा हात
मुस्लीम समाज बांधव समाजाप्रती देणे म्हणून उत्पन्नातील काही वाटा गोळा करतात. त्याला जकता म्हणून संबोधले जाते. ही जकात सामाजातील वंचित बांधवांना मदत म्हणून दिली जाते. जमा झालेली मदत ईद साजरी होण्यापूर्वी अनेक कुटुंबांना दिली गेली. एका समाज बांधवांने जकात देताना समाजातील गरीब परिवाराला मदत म्हणून बैलजोडी घेऊन दिली. या त्या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला. दान देणाऱ्यांनी ‘गुप्तदान श्रेष्ठदान’ म्हणत आपले नाव गुप्त ठेवले.

Web Title: Namaz for the release of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.