कळंबच्या चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:02 PM2018-09-15T22:02:25+5:302018-09-15T22:03:26+5:30

श्री चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर जावे, इतका महिमा या मंदिराचा आहे. परंतु या मंदिराची ख्याती आणि माहिती सर्वदूर पोहोचविण्यात आपण अपयशी ठरतो आहो.

The name of Kalamb's resignation should go to the national level | कळंबच्या चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे

कळंबच्या चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे

Next
ठळक मुद्देविजय दर्डा : देवस्थान समितीतर्फे भावपूर्ण सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : श्री चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर जावे, इतका महिमा या मंदिराचा आहे. परंतु या मंदिराची ख्याती आणि माहिती सर्वदूर पोहोचविण्यात आपण अपयशी ठरतो आहो. येणाऱ्या काळात या मंदिराचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी विजय दर्डा हे शनिवारी कळंब नगरीत आले होते. त्यांनी श्री चिंतामणीचे पूजन व आरती केली. यावेळी चिंतामणी देवस्थान समितीच्यावतीने विजय दर्डा यांचा मंदिर सभागृहात सत्कार सोहळा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ.अशोक उईके, कळंबच्या नगराध्यक्ष सुनिता डेगमवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी उपस्थित होते.
विजय दर्डा म्हणाले, चिंतामणीचे मंदिर परदेशात असते तर तेथील लोकांनी या स्थळाला जागतिक पर्यटन स्थळाचे स्वरुप आणले असते. परंतु आपल्याकडील अनेक पौराणिक व धार्मिक महत्व असणारी स्थळे अडगळीत पडली आहे. या स्थळांना विकसित केल्यास तेच पर्यटनस्थळ होऊ शकते. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होऊ शकतो. परंतु आजपर्यंतच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. खर तर टुरीझम हा विषय फार महत्वाचा आहे. खासदार असताना मी हा विषय वारंवार सभागृहात मांडला. टुरीझम हा विभाग स्वत: पंतप्रधानांनी आपल्या अखत्यारित्या ठेवला तर मोठा बदल घडेल, अशी अपेक्षाही विजय दर्डा यांनी व्यक्त केली.
सत्कार सोहळ्याचे संचालन प्रा.घनश्याम दरणे यांनी केले. आभार चंद्रशेखर चांदोरे यांनी मानले. यावेळी अनेकांनी विजय दर्डा यांचे पुष्पहाराने स्वागत केले.
या प्रसंगी नगर उपनगराध्यक्ष मनोज काळे, खरेदी-विक्री संघाचे सभापती बालु पाटील दरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, देवस्थानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, बाजार समितीचे संचालक योगेश धांदे, मधुकर गोहणे, महेश जयस्वाल, गजानन उमरतकर, विजय गेडाम, प्रताप पारसकर, सुभाष यादव, नसीम काझी, अनिल नवाडे, राजेंद्र हारगुडे, सिध्देश्वर वाघमारे, प्रतिभा मेत्रे, रमेश मेत्रे, बाबा लुकमान, रामेश्वर सातपुते, प्रवीण निमकर, मुश्ताक शेख, भगवंत उमरतकर यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: The name of Kalamb's resignation should go to the national level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.