नेर येथे राष्ट्रीय धम्म परिषद

By admin | Published: January 5, 2017 12:13 AM2017-01-05T00:13:06+5:302017-01-05T00:13:06+5:30

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि नामांतर दिनाच्या पर्वावर स्थानिक सहारानगरातील श्रावस्ती बौद्ध विहार

National Dhamma Council at Ner | नेर येथे राष्ट्रीय धम्म परिषद

नेर येथे राष्ट्रीय धम्म परिषद

Next

तीन दिवस विविध कार्यक्रम : प्रबोधन, नाट्यप्रयोग, धम्मरॅली, धम्मदेसना
नेर : राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि नामांतर दिनाच्या पर्वावर स्थानिक सहारानगरातील श्रावस्ती बौद्ध विहार परिसरात १२, १३ व १४ जानेवारी रोजी सहावी राष्ट्रीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. बहुजन समन्वय विचार संस्थेच्यावतीने आयोजित या परिषदेचे मुख्य संयोजक तथा स्वागताध्यक्ष मोहन भोयर हे आहेत.
१२ जानेवारीला सकाळी ११ वाजता धम्मध्वजारोहण, बुद्धवंदना, धम्मरॅली व धम्म परिषदेचे उद्घाटन होईल. भदन्त आनंद महाथेरो (आगरा), भदन्त प्रज्ञाशील महाथेरो (बुद्धगया), भदन्त थेरोज्योती, भदन्त सुमेधबोधी महाथेरो, धम्मानंद महास्थवीर, भदन्त सत्यानंद महाथेरो आणि इतर भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्मदेसना होईल. दुपारी ३ वाजता प्रा. शांतरक्षित गावंडे यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या कविसंमेलनात महाराष्ट्रातील कवी सहभागी होणार आहेत. विचार प्रबोधनाचे पहिले सत्र ‘समतावादी तत्वज्ञ : तथागत बुद्ध आहे’ या विषयावर होईल. प्रा.डॉ. प्रदीप दंदे अध्यक्ष, तर प्रमुख वक्ते डॉ. प्रकाश राठोड, गीत घोष आहेत. एकपात्री नाट्यप्रयोग ‘भीमाच्या लेकरांनो’ व कथाकथन शिलवंत वाढवे सादर करतील. रात्री ८ वाजता भगवान गावंडे यांचा प्रबोधन कार्यक्रम होईल.
१३ जानेवारीला ‘आधुनिक युगामध्ये बुद्ध धम्म विचारांची गरज’ या विषयावर धम्मदेसना होईल. भदन्त सुमेधबोधी महाथेरो अध्यक्ष, तर भिक्खू बुद्धकन्या, भदन्त कश्यपथेरो, भदन्त हर्षबोधी, भदन्त राहुल हे मुख्य मार्गदर्शक आहेत. दुपारी २ वाजता ‘पागलाची नगरी’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सतीश रामटेके सादर करतील. सायंकाळी ४ वाजता प्रबोधन सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानात्मक आर्थिक नीती’ या विषयावर प्रा.डॉ. कमलाकर पायस, प्रा.डॉ. सुनंदा वालदे यांचे मार्गदर्शन होईल. नाना अघम यांचा वऱ्हाडी फटका हा विनोदी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री संजय देशमुख, अनिल गोंडाणे, महेंद्र गजघाटे, राहुल ठाकरे, सुलोचना भोयर आदी मार्गदर्शन करतील. रात्री ८ वाजता प्रा. अनिरुद्ध वनवर यांचे प्रबोधन व गीतगायन होईल.
१४ रोजी गौतम पाढेण यांचे भीमगीत व सूगमसंगीत होईल. दुपारी १२ वाजता भदन्त सत्यानंद महाथेरो, भदन्त महाथेरो महानागरत्न, भदन्त धम्मयान यांच्या मार्गदर्शनात धम्मदेसना होईल. दुपारी २.३० वाजता विचार प्रबोधन सत्रात ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कायद्याचे वास्तव व समाजातील समज-गैरसमज’ या विषयावर माजी न्यायमूर्ती खिल्हारे, अ‍ॅड. मिलिंद भगत, अ‍ॅड. धनंजय मानकर यांचे मार्गदर्शन होईल. अ‍ॅड. जयसिंग चव्हाण अध्यक्षस्थानी राहतील. सायंकाळी ६ वाजता परमानंद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत समारोप आणि सत्कार समारंभ होईल. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी आदी उपस्थित राहतील. यानंतर हेमंत शेंडे आणि संच चंद्रपूर यांचा ‘जागर समतेचा’ हा कार्यक्रम होणार आहे.
या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन धम्म परिषदेचे मुख्य संयोजक मोहन भोयर यांच्यासह आयोजन समितीचे प्रा. शांतरक्षित गावंडे, अ‍ॅड. राहुल घरडे, धनंजय मानकर, रवींद्र अलोणे, प्रा. प्रशिक भोयर, नरेंद्र खरतडे, गंगाधर मिसळे, पंडित रामटेके, लक्ष्मण अघम, महादेव घरडे, विलास कांबळे आदींनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: National Dhamma Council at Ner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.