राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ

By Admin | Published: July 3, 2014 11:47 PM2014-07-03T23:47:27+5:302014-07-03T23:47:27+5:30

वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे.

National highway work slow | राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ

googlenewsNext

पाटणबोरी : वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. दक्षिण भारतात जवळपास पूर्णत्वास गेलेल्या या महामार्गाचे काम महाराष्ट्रात अद्याप अर्धवटच आहे.
या महामार्गाचे कित्येक ठिकाणी काम थांबले आहे़ या महामार्गाचे प्रत्येकी २५ किलोमीटर अंतराचे टप्पे पाडून एकाच वेळी अनेक कंपनींना काम विभागून देण्यात आले. त्यातील काही कंपन्यांनी गाशा गुंंडाळल्याने तेच काम पुन्हा दुसऱ्या कंपनीला देण्यात आले. पिंपळखुटी ते केळापूर दरम्यानचा २५ किलोमीटरचा टप्पाही त्यामुळे रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़
या महामार्गावर पाटणबोरी ते केळापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातच रस्ता खोदकामामुळे अरूंद झाला. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ परिणामी अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ हे काम करताना पूर्वीच्या रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. तसेच जेथे रस्ता पूर्ण उखडला, तेथे डांबरीकरणाचा थर टाकण्याची गरज आहे़ मात्र त्या दृष्टीने काहीच हालचाल होत नाही.
या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र जड वाहतूक सुरू असते. परिणामी मार्गावरील खड्ड्यात पुन्हा भरत पडत आहे. वाहनधारकांना अपघात झाल्यास आपले प्राण गमवावे लागत आहे. नॅशनल हायवे आॅथॉरीटी मात्र डोळे लावून बसून आहे. या अ‍ॅथॉरीटीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलून चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून काम रखडल्याने पूर्वीच्या रस्त्याचीही दुर्दशा झाली. याच मार्गावर वर्षभरापूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे वाहन पंक्चर झाले होते, हे विशेष. तरीही अद्याप काम संथच आहे. (वार्ताहर)

Web Title: National highway work slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.