‘जेडीईएमएस’मध्ये राष्ट्रीय गणित दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:14 PM2018-12-22T22:14:42+5:302018-12-22T22:15:06+5:30
येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वर्ग सात, नऊ व दहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य मीनी थॉमस, उपप्राचार्य वसानी, रश्मी उपाध्याय यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वर्ग सात, नऊ व दहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य मीनी थॉमस, उपप्राचार्य वसानी, रश्मी उपाध्याय यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.
यावेळी गणित शिक्षिका पुष्पा बाजपेयी यांनी रामानुजन यांचे गणित विषयात असलेले योगदान याविषयी सांगितले. गणित विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसा शिकविता येईल, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. आदीश्री कुल्लरवार, अवंती पाल यांनीही विचार मांडले.
ताई केशट्टीवार यांनी वर्ग नऊ आणि दहाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरे स्पर्धा घेतली. तसेच वर्ग नऊच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. संपदा काळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे सचिव कीर्ती गांधी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले.