पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक करा
By admin | Published: January 3, 2016 02:59 AM2016-01-03T02:59:10+5:302016-01-03T02:59:10+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी,...
प्रशासनाला निवेदन : अखिल भारतीय माळी महासंघाचा पुढाकार
यवतमाळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
पुणे येथील भिडेवाड्यात असलेल्या या इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शासनही या इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. ही ऐतिहासिक वास्तू देशाला प्रेरणा देणारी असल्याने या
ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात
आली आहे.
निवेदन सादर करताना अॅड. राजेंद्र महाडोळे, देवीदास अराठे, उषा खरे, विनोद इंगळे, नरेश उन्हाळे, अविनाश घाटे, अरुण जवके, सचिन महाडोळे यांच्यासह निर्मिक महिला बहुद्देशीय विकास महामंडळ, दीनबंधू कल्याण मंडळ, क्रांतिसूर्य युवा मंडळ, ओबीसी क्रांती दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)