राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया सुरू, पण प्रतिसाद कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:03 AM2020-07-14T11:03:41+5:302020-07-14T11:06:01+5:30

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा १५ जूनपासून ६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ६ जुलै उलटून गेल्यावरही अपेक्षित प्रमाणात अर्ज न आल्याने मुदतवाढ द्यावी लागली आहे.

The National Teacher Award process begins, but the response is low | राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया सुरू, पण प्रतिसाद कमी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया सुरू, पण प्रतिसाद कमी

googlenewsNext
ठळक मुद्देमोबाईलवरूनही अर्ज भरा पुरस्कार नाही मिळाला, तरी प्रमाणपत्र मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाच सप्टेंबर रोजी वितरित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया सुरू झाली असून यंदा शिक्षकांना मोबाईलवरूनही पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारासाठी निवड झाली नाही, तरी प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र मिळणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा १५ जूनपासून ६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ६ जुलै उलटून गेल्यावरही अपेक्षित प्रमाणात अर्ज न आल्याने मुदतवाढ द्यावी लागली आहे. पुरस्कार योजनेच्या संचालक जी. विजया भास्कर यांनी याबाबत ६ जुलै रोजीच राज्याच्या मुख्य सचिवांसह शिक्षण सचिवांना पत्र पाठवून ११ जुलैपर्यंत अर्ज मागविण्याची सूचना दिली आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पोर्टलवर मोबाईलवरूनही शिक्षकांना अर्ज भरता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अर्जांची छाननी जिल्हा निवड समितीने केल्यानंतर, राज्याच्या निवड समितीकडून निवड केली जाणार आहे. त्यातून निवड शिक्षकांची नावे पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठविली जाणार आहेत. मात्र ज्यांना प्रत्यक्ष पुरस्कार मिळणार नाही, परंतु, जिल्हा व राज्य निवड समितीकडून ज्यांच्या नावे पुढे ‘फॉर्वड’ केली जातील, त्यांच्यासाठी पोर्टलवर ‘अ‍ॅटोमॅटिक’ प्रमाणपत्र तयार होणार आहे. हे प्रमाणपत्र निवड समितीसदस्यांच्या स्वाक्षरीनिशी शिक्षकांना दिले जाणार आहे. शिवाय, त्याचीच एक प्रत पोर्टलवरही पुन्हा अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार मिळाला नाही, तरी प्रक्रियेत सहभागी होताच शिक्षकांना सन्मान मिळणार आहे.

असे आहे वेळापत्रक
शिक्षकांनी ११ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करणे
जिल्हा निवड समितीने छानन करून निवडक अर्ज राज्य समितीकडे २१ जुलैपर्यंत पाठविणे
राज्य समितीकडून निवडक शिक्षकांची नावे राष्ट्रीय निवड समितीकडे ३१ जुलैपर्यंत पाठविणे
राष्ट्रीय समितीकडून ३ ऑगस्टपर्यंत शिक्षकांना सूचित करून ६ ते १४ ऑगस्ट या काळात शिक्षकांच्या मुलाखती घेऊन प्रत्यक्ष निवड प्रक्रिया होईल.
निवड झालेल्या शिक्षकांना १६ ते १७ ऑगस्टपर्यंत निमंत्रणे पाठवून ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल.

Web Title: The National Teacher Award process begins, but the response is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक