दिग्रसमध्ये घडले राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:17+5:30
शहरात शिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक घंटीबाबा मंदिरासमोर येताच मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे स्वागत करण्यात आले. यातून शहरात राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले.
शहरात शिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक घंटीबाबा मंदिरासमोर येताच मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
शिवछत्रपती संघटनेचे रवींद्र अरगडे, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, केतन रत्नपारखी, आरोग्य सभापती सैयद अकरम, विनायक दुधे, ठाणेदार सोनाजी आमले, माजी नगराध्यक्ष नूर महमद खान, अरविंद मिश्रा, प्रज्योत अरगडे, राहुल देशपांडे आदींचे मुस्लीम बांधवांनी स्वागत केले.
मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अफजल खान, सचिव अरबाज धारिवाला, पी.पी. पप्पूवाले, सुरेश चिरडे, मजहर अहमद खान, किशोर कांबळे, यशवंत सूर्वे, साजीद पतलेवाले, घंटीबाबा संस्थानचे अध्यक्ष नाना पाटील महिंद्रे, सचिव डॉ.प्रदीप मेहता, प्रा.मतीन खान, विष्णूपंत यादव, रामदास पद्मावार, मुनीर खान, उद्धव अंबुरे, अमीन कलरवाले, अभय इंगळे, अजीज शेख, गोपाल शाह, अमीन चव्हाण आदींनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमातून सामाजिक ऐक्याचे दर्शन झाले. दिग्रस शहरामध्ये नेहमीच सामाजिक एकोपा जोपासला जातो, असा संदेश यातून देण्यात आला. शहरात सर्वधर्मीय एकोप्याने नांदतात. सण, उतसव साजरे करतात. त्याची पुन्हा एकदा शिवजयंतीनिमित्त प्रचिती आली.