राष्ट्रवादी काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:07 AM2018-10-03T00:07:01+5:302018-10-03T00:07:17+5:30

केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणामुळे आर्थिक व सामाजिक स्थिती खालावत चालली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

Nationalist Congress Movement | राष्ट्रवादी काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपा सरकारचा निषेध : आझाद मैदाना येथे धरणे, जिल्हा प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणामुळे आर्थिक व सामाजिक स्थिती खालावत चालली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. याविरोधात आवाज उठवित राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी येथील आझाद मैदानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मौनव्रत धरणे देऊन निषेध नोंदविला.
यावेळी आंदोलकांनी सरकारला निवेदनाच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे विचारली. किती लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यात आले, पेट्रोल डिझेलवरील अवास्तव व्हॅट रद्द करून दर आटोक्यात कधी आणणार, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून किती युवकांना रोजगार मिळाला, कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबल्या काय, मुलींच्या अपहरणात महाराष्ट्र १ नंबरवर का आला, मुद्रा योजनेतून किती उद्योग सुरू झाले, पाणी उपशावर निर्बंध लादून शेतकरी संपवायचा आहे काय, मेक ईन महाराष्ट्र अंतर्गत किती गुंतवणूक झाली, किती लोकांना रोजगार मिळाला आदी प्रश्नांचा यात समावेश होता.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वॉजा बेग यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, उत्तम गुल्हाने, राजू जॉन, अशोक राऊत, सतीश मानधना, सुनील राठोड, खलील बेग, चिराग शाह आदी उपस्थित होते.

Web Title: Nationalist Congress Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.