दिवटेच्या खुनातील नववा आरोपी अटकेत
By admin | Published: September 5, 2016 01:08 AM2016-09-05T01:08:13+5:302016-09-05T01:08:13+5:30
बहुचर्चीत प्रवीण दिवटे हत्याकांडातील नवव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळीविरोधी पथकाने अमरावतीतून अटक केली.
अमरावतीत कारवाई : दोघांचा शोध जारी
यवतमाळ : बहुचर्चीत प्रवीण दिवटे हत्याकांडातील नवव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळीविरोधी पथकाने अमरावतीतून अटक केली. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली.
शत्रु मदनलाल राऊत (२२) रा. जामनकरनगर, यवतमाळ याने खुनाच्या घटनेनंतर अमरावती येथील साईनगरमध्ये आश्रय घेतला होता. पोलिसांनी आतापर्यंत या खुनात विधीसंघर्षग्रस्त बालकासह आठ जणांना अटक केली आहे. दिवटे खुन प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू असून, तक्रारीत नमूद असलेले आहे. तक्रारीत उल्लेख नसलेले मात्र खुनात सहभाग असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून, शत्रु राऊत हा नववा आरोपी ठरला आहे. त्याच्या अटकेची कारवाई टोळी विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक प्रशांत गीते आणि त्यांच्या सहकार्यानी केली. या पथकाच्या टप्प्यात आणखी खुनाच्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असलेले दोन आरोपी आहेत.
पोलीस कोठीत असलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहन, मोबाईल जप्तीची कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्थानिक गुन्हेशाखेचे सर्वच पथक या खुनाच्या तपासात लागले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा तपास सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)