नक्षल दलम कमांडर यवतमाळात आश्रयाला? यवतमाळ पाेलिस मागावर

By सुरेंद्र राऊत | Updated: February 18, 2025 17:57 IST2025-02-18T17:56:28+5:302025-02-18T17:57:07+5:30

Yavatmal : ओळख लपवून बनला ट्रक चालक

Naxal Dalam commander seeks refuge in Yavatmal? Yavatmal Police on the trail | नक्षल दलम कमांडर यवतमाळात आश्रयाला? यवतमाळ पाेलिस मागावर

Naxal Dalam commander seeks refuge in Yavatmal? Yavatmal Police on the trail

सुरेंद्र राऊत/यवतमाळ
यवतमाळ : केंद्र सरकाने नक्षल चळवळ माेडीत काढण्याची माेहीम हाती घेतली आहे. पाेलिसांच्या सतत कारवायांमुळे नक्षल चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. ९० च्या दशकात नक्षल चळवळीत सक्रिय राहून झारखंड मधील हुुहुर्रू दलमचा कंमाडर राहिलेला जहाल नक्षली यवतमाळात वास्तव्याला असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांनी मिळाली आहे. त्यावरून पाेलिस त्याच्या मागावर आहेत. अधिक माहितीसाठी झारखंड पाेलिसांसाेबत पत्रव्यवहार केला जात आहे.

नक्षल चळवळीत वणी आणि यवतमाळचा काही भाग हा रेस्ट झाेन हाेता. पाेलिस कारवाईचा दबाव वाढल्यानंतर येथे नक्षली ओळख लपवून आश्रयाला राहत हाेते. यातूनच कधीकाळी नक्षल दलम कमांडर असलेली व्यक्ती यवतमाळातील गाेदाम फैल भागात २०१३ पासून वास्तव्याला असल्याची माहिती यवतमाळ पाेलिसांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याच्या मागावर आहे.

हा दलम कमांडर झारखंड राज्यातील हुहुर्रू दलममध्ये काम करत हाेता. त्याच्यावर नक्षल चळवळीसाठी आर्थिक वसुलीची जबाबदारी हाेती. त्याने भुसुरुंग स्फाेट घडवून आणले आहेत. पाेलिसांसाेबत चकमकीत प्रतिहल्ला करणे, सीआरपीएफ जवानाची हत्या केल्याचाही आराेप आहे. दलमच्या आर्थिक व्यवहारात गडबड केल्याने त्याने झारंखडमधून जीवाच्या भीतीने मुंबई गाठली. तिथे काही वर्षे बाेरिंगच्या मशीनवर काम केल्यानंतर ताे एका व्यक्तीच्या माध्यमातून यवतमाळात आला. येथे ताे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती पाेलिसांना आहे. त्यावरूनच पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत.
चाैकट

संशयिताची बुधवारी पटणार ओळख
त्या संशयित नक्षल दलम कमांडरची ओळख पटविण्यासाठी झारखंड पाेलिस यवतमाळात येणार आहे. त्यानंतरच संशयित व्यक्ती खरंच दलम कमांडर आहे का, याची पडताळणी हाेणार आहे. एकूणच याबाबत स्थानिक पाेलिसांनी काेणतीच अधिकृत माहिती देण्याचे टाळले आहे. याबाबत बुधवारी सकाळी पत्रपरिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Naxal Dalam commander seeks refuge in Yavatmal? Yavatmal Police on the trail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.