दारव्हा येथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:22 PM2018-04-27T22:22:21+5:302018-04-27T22:22:21+5:30

केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

NCP attacks in Darwha | दारव्हा येथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल

दारव्हा येथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Next
ठळक मुद्देएसडीओ कार्यालयावर धडक : केंद्र व राज्य सरकारचा निषेधलोकमत न्यूज नेटवर्क

दारव्हा : केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
स्थानिक गजानन महाराज मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक चौक, गोळीबार चौक, तेलीपुरा, पोस्ट आॅफिस चौक मार्गे हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला संबोधित करताना संयोजक व प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांवर आसूड ओढला. किती घोषणांची अंमलबजावणी झाली याचे उत्तर सरकारने द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, शेतातील सर्व कामे मनरेगा अंतर्गत करावी, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, फवारणीबाधित शेतकरी कुटुंबांना दहा लाखांची मदत द्यावी, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी मंचावर आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर, आर्णी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, अ‍ॅड. आशीष देशमुख आदी उपस्थित होते.
भर उन्हात या मोर्चात दारव्हा, दिग्रस, नेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. गेल्या १६ एप्रिलपासून राष्ट्रवादीने या तीनही तालुक्यात हल्लाबोल आंदोलन सुरू केले. शुक्रवारच्या मोर्चाने या आंदोलनाचा समारोप झाला.
अनेक पदाधिकारी उशिरा पोहोचले
या आंदोलनात राष्ट्रवादीचे अनेक माजी मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र माजी मंत्री अनिल देशमुख सभास्थळी पोहोचले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करताना केवळ घोषणांचा बाजार मांडणाºया शासनामुळे शेतकरी व जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. केंद्र व राज्य सरकार शेतकºयांपेक्षा उद्योगपतींचेच असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईकही उशिराने सभास्थळी पोहोचले.

Web Title: NCP attacks in Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.