यवतमाळ-वाशिमवर राष्ट्रवादीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:00 PM2018-10-22T22:00:43+5:302018-10-22T22:00:59+5:30
यवतमाळ - वाशिम लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम असून आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदासंघ राष्ट्रवादीलाच मिळावा, असा एकमुखी सूर जिल्हा कार्यकर्ता बैठकीतून उमटला. शिवाय विधानसभेच्याही जागा वाटपात राष्ट्रवादीला किमान चार मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी पक्ष निरीक्षकांकडे करण्यात आली. पक्षाने बुथ लेव्हलपासून बांधणी केली असून काही मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचे सूतोवाच नेत्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ - वाशिम लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम असून आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदासंघ राष्ट्रवादीलाच मिळावा, असा एकमुखी सूर जिल्हा कार्यकर्ता बैठकीतून उमटला. शिवाय विधानसभेच्याही जागा वाटपात राष्ट्रवादीला किमान चार मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी पक्ष निरीक्षकांकडे करण्यात आली. पक्षाने बुथ लेव्हलपासून बांधणी केली असून काही मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचे सूतोवाच नेत्यांनी केले.
यवतमाळातील सहकार भवनात सोमवारी राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रवादीने जिल्ह्यात गाव पातळीपासून बांधणी केली आहे. बुथ कमिट्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. मात्र निवडणुकीच्या काळात प्रदेशस्तरावर वाटाघाटी करून तिकीट वाटप केले जाते. त्यानंतर गावपातळीवर असलेल्या कार्यकर्त्याला दुसºयाच कोणाचे काम करावे लागते. पक्षाची शक्ती कितीवेळा दुसºयासाठी खर्च करायची, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या लोकसभेत यवतमाळ-वाशिममधून राष्ट्रवादीच लढणार आहे. सलग दोन वेळा येथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. लोकसभेतील राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार नाईक घराण्यातील राहील, अशी घोषणा करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार संदीप बाजोरिया, पक्षनिरीक्षक किशोर माथनकर, नानाभाऊ गाडबैले, वसंतराव घुईखेडकर, सभापती निमिष मानकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष अॅड़ क्रांती राऊत, सुभाष ठोकळ, ययाती नाईक, अनुताई राठोड, बी.जी. राठोड, शिवाजी राठोड, अशोकराव घारफळकर, सतीश भोयर, उत्तमराव शेळके, मुबारक तंवर, उत्तम गुल्हाने, अॅड. अनिरूध्द लोणकर, वर्षा निकम यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.