राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:25 PM2018-10-27T21:25:25+5:302018-10-27T21:26:20+5:30

राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे.

NCP's 'answer two' footprint | राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जवाब दो’ पदयात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जवाब दो’ पदयात्रा

Next
ठळक मुद्देआर्णीतून प्रारंभ : येड्या-गबाळ्या सरकारला विचारणार जाब

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे. आर्णीतून २९ आॅक्टोबरला पदयात्रेची सुरूवाइ होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी शनिवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी विविध घोषणा दिल्या. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार, बेरोजगारांना आश्वासने दिली. मात्र त्यांची पूर्तता केली नाही, असा आरोप आमदार बेग यांनी केला. या सर्व आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी पक्षातर्फे सोमवारी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘जवाब दो’ पदयात्रेचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून ‘येड्या-गबाळ्यां’च्या सरकारला जवाब विचारणार असून शेतमालाला देण्यात येणाऱ्या हमी दराचे काय झाले, शेतकºयांच्या संपूर्ण कर्ज माफीच्या भिजत घोंगड्याचे काय झाले, दरवर्षी दोन कोटी युवकांच्या नोकरीचे काय झाले, शेतमालाची नाफेड खरेदी कधी सुरू करणार, शेत मालाला उत्पादन खर्चावर आधारित दीड पट भाव कधी देणार, पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेलची दरवाढ कधी थांबणार, शेतीला २४ तास वीज कधी मिळणार, सव्वा कोटी घरकूल सव्वा लाख विहिरी शेतकºयांना कधी मिळेल, आदी प्रश्न सरकारला विचाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येकांच्या खात्यात १५ लाख कधी टाकणार, बोंडअळीची मदत दिवाळीपर्यंत देणार का, जीएसटीमधील जाचक अटी रद्द करणार का, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च मनरेगामधून कधी सुरू करणार, शेतकरी, मजूर, कामगारांना ५८ वर्षांनंतर निवृत्ती वेतन देण्याचे काय झाले, मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे काय झाले, महात्मा फुले आरोग्य सेवेचा लाभ शेतकºयांना कधी मिळणार, महिला सुरक्षेचे काय, नोटबंदीमुळे देश रांगेत उभा केला त्याचे काय, यवतमाळचे कृषी महाविद्यालय इतरत्र का पळविले, आदी प्रश्नांची उत्तरे सरकरला मागणार असल्याचे आमदार ख्वाजा बेग यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष रवी नालमवार, शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार, नपतील गटनेते चिराग शहा, संदीप बुटले, सुनील पोटगंदलावार, यासिन नागानी, संजय व्यवहारे, जाफर शेख, सुनील राठोड, परवेज शेख आदी उपस्थित होते.

Web Title: NCP's 'answer two' footprint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.