ढाणकीत लसीकरणासाठी नगरसेवकांनी पुढे येण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:44 AM2021-05-11T04:44:16+5:302021-05-11T04:44:16+5:30
कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. मात्र, आता लस निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. देशात लसीकरण सुरू असताना नागरिक ...
कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. मात्र, आता लस निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. देशात लसीकरण सुरू असताना नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या मनातील भीती घालवणे गरजेचे आहे. ही भीती घालवण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन नागरिकांचे प्रबोधन केले, तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.
कोरोनाची संभाव्य पुढील लाट थांबविण्यासाठी संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. शहरातील प्रत्येक नगरसेवकाने लसीच्या उपलब्धतेनुसार आपापल्या प्रभागाचे लसीकरण करण्यास भर देऊन स्वतः पुढाकार घेतला, तर लसीकरणाचा आकडा वाढेल.
सध्या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे लस उपलब्ध होईपर्यंत नगरसेवकांनी प्रभागात जाऊन नागरिकांना लसीचे महत्व आणि फायदे सांगणे गरजेचे आहे. आजही शहरातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली नाही. ते लस घेण्यास टाळत आहे. त्यांच्या मनातील भीती घालवणे सुद्धा गरजेचे आहे. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.