देशाला गौतम बुद्ध, आंबेडकर यांच्या विचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:01 AM2019-02-28T00:01:23+5:302019-02-28T00:04:15+5:30
देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले. येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले.
येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते. त्यांनी आजच्या काळात शांततेची गरज असून त्यासाठी जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय खडसे होते. दोन दिवसीय धम्म परिषदेत अनेक गायकांनी भीमगीतांमधून विचारमंथन केले. प्रा.खेमधम्मो यांनी गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची जगाला गरज असल्याचे सांगितले. अशोक निकाळजे यांनी समारोपीय कार्यक्रमात गीते सादर केली. समारोपीय कार्यक्रमात विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार आदित्य संजय भगत याचा समाजभूषण म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ही परिषद पार पडली. दोन्ही दिवस नागरिकांची प्रचंड गर्दी होती. आयोजक सागर पाईकराव, परिषदेचे अध्यक्ष दलित खडसे, स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे आदींनी पुढाकार घेतला. आभार रामराव कांबळे यांनी मानले.