निरीक्षकाचे दुर्लक्ष, ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:51+5:302021-08-25T04:46:51+5:30
पेट्रोल पंपावर पारदर्शकतेची गरज पांढरकवडा : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांची फसवणूक केली जाते. पेट्रोल ...
पेट्रोल पंपावर पारदर्शकतेची गरज
पांढरकवडा : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांची फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाईप पारदर्शक असावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे. सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
गुटखा तस्करीवर नियंत्रणाची मागणी
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अवैधरीत्या दारू विक्री सुरू आहे. तसेच गुटखाबंदी असूनही अनेक गावात गुटखा विक्री सुरू आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून व्यसनाधीनतेने कुटुंबातील कलह वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गुटखा तस्करी व अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
पांढरकवडा : तालुक्यातील गावातून वाहणाऱ्या नदीपात्रात झाडाझुडपाची संख्या वाढली आहे. तसेच अवैध रेती उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. यामुळे नदीपात्रातील झाडेझुडपे कमी करून, वाळू उपसा थांबवून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नदीचे खोलीकरण व सौदर्यीकरणच करण्यात आले नाही. त्यामुळे नदी दूषित होत चालली आहे.