ना एसटीचा टायमिंग, ना चौकशी कक्षाचा बोर्ड; समोर प्रवासी आणि मागे कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 06:48 PM2024-08-05T18:48:53+5:302024-08-05T18:53:36+5:30

बसस्थानकातील खड्ड्यात अपघातांची मालिका : ज्येष्ठांना एक प्रकारची शिक्षा

Neither the timing of the ST, nor the board of inquiry room; Passengers in the front and trash in the back | ना एसटीचा टायमिंग, ना चौकशी कक्षाचा बोर्ड; समोर प्रवासी आणि मागे कचरा

Neither the timing of the ST, nor the board of inquiry room; Passengers in the front and trash in the back

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
राज्य परिवहन महामंडळाचे यवतमाळचे बसस्थानक समस्यांचे माहेरघर झाले आहे. या ठिकाणी दररोज नवीन समस्यांचा उदय होतो. प्रवाशांच्या सेवेसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अचूक अंदाज मिळावा म्हणून ट्रॅकर सिस्टीम तयार करण्यात आली. त्यासाठी स्मार्ट टीव्ही लागला. मात्र माहिती देणारी यंत्रणाच नाही. इतकेच नव्हे तर वाहनांची माहिती सांगणारे चौकशी कक्षाचे बोर्ड फाटले आहे.


यवतमाळच्या बसस्थानकाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मनस्ताप निर्माण होतो. आपण या ठिकाणी आलोच कशाला. आणि या अस्वच्छ वातावरणात राहायचे कशाला असे म्हणून अनेकजन नाके मुरडतात. मात्र पर्याय नसतो, या स्थितीत प्रवाशी बसस्थानकावर ये-जा करतात. त्यात पाय घसरून अनेकजण बसस्थानकातच पडतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे अनेक ज्येष्ठांनी बसस्थानकावर न जाणेच सरू केले. 


चौकशी कक्षात त्या यंत्राचा उपयोग काय?
प्रवाशांना बाहेर ठिकाणावरून यवतमाळात येणाऱ्या बसगाडी किती दूर अंतरावर आहे. त्या गाडीचा वेग किती आहे. ही गाडी किती वेळात येणार आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये दर्शविली जाते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हा डिस्प्ले बोर्ड बंद आहे. यामुळे हा डेस्प्ले बोर्ड केवळ नावालाच उरला आहे.


निवाऱ्यात कचरा आणि पाण्याचे डबके
बसस्थानकाच्या आतमध्ये असलेल्या टिनाच्या शेडच्या निवाऱ्यात कुठलीच व्यवस्था नाही. या ठिकाणी एसटीचे दोन बाकडे आहे. त्यावर नागरिकांना बसावे लागते.


अपुऱ्या जागेने प्रवाशांची धावाधाव
बसस्थानकाच्या आतमध्ये पाण्याचे जागोजागी डबके साचले आहे. त्यातही अपुरी जागा असल्याने एसटी बस कुठल्या बाजूने लागेल याचा नेमच नसतो. यातून प्रवाशी बसस्थानकाच्या मध्यभागी उभे राहतात. यातही चिखल, गाटा तुटवडीत प्रवाशांची धावपळ होते. मात्र वयावृद्ध प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसतो.


प्रवाशी काय म्हणतात...
"शाळेसाठी दररोज बसस्थानकावर यावे लागते. मात्र तासनतास बस लागत नाही. त्यातही बसण्याकरिता चांगली सुविधा नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची फजिती होते. या परिस्थितीने अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत."
- सरिता नेवारे


"बसस्थानकाची बकाल अवस्था पाहून आतमध्ये पायही ठेवण्याची हिंमत होत नाही. यातून जास्त प्रमाणात आजार पसरण्याचाच अधिक धोका वाटतो. एसटी परिवहन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्या."
- रमेश ढंगारे

Web Title: Neither the timing of the ST, nor the board of inquiry room; Passengers in the front and trash in the back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.