नेर बायपास व तहसीलचे काम लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 09:54 PM2018-03-12T21:54:29+5:302018-03-12T21:54:29+5:30

शहराच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आहो. बायपाससह नगरपरिषद, तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली.

Ner Bypass and Tehsil will be soon in operation | नेर बायपास व तहसीलचे काम लवकरच

नेर बायपास व तहसीलचे काम लवकरच

Next
ठळक मुद्देसंजय राठोड : सिंधुताई सपकाळ यांचा सन्मान, विविध विकास कामांचा कार्यारंभ

आॅनलाईन लोकमत
नेर : शहराच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आहो. बायपाससह नगरपरिषद, तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली.
विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या नेतृत्त्वात होत असलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गुजरी बाजार येथे होणाºया व्यापार संकुल, भाजी मार्केट, नबाबपूर येथे पाण्याची टाकी आदी कामांचे भूमिपूजन ना. संजय राठोड यांच्या हस्ते झाले.
यावेळी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी मंचावर नगरपरिषद उपाध्यक्ष पवन जयस्वाल, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, बाबू पाटील जैत, मुख्याधिकारी धीरजकुमार गोहळ, अजय भुसारी, भाऊराव ढवळे, नामदेव खोब्रागडे, मनीषा गोळे, रवींद्र राऊत, दिवाकर राठोड, माया राणे, संध्या चिरडे, रश्मी पेटकर, इब्राहिम नूर, उज्ज्वला मेंढे, भरत मसराम, निखिल जैत, गजानन भोकरे, संजय दारव्हटकर, वैशाली मासाळ, निर्मला संगेवार, रूपाली दहेलकर, वैष्णवी गुल्हाने, मनोज नाल्हे, दीपक आडे, विनोद जयसिंगपुरे, शालीक गुल्हाने, सुनील खाडे, सुभाष भोयर, खुशाल मिसाळ, सुजित कुंभारे, अनिल महाजन, संजय चतुरकार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी पवन जयस्वाल यांनी शहराचा कायापालट करण्यासाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सुनील आडे यांनी केले. यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, तालुका व शहर शिवसेनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.
विकासाची जाण असणारा लोकप्रतिनिधी लाभणे सौभाग्य
मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास आणि जनतेप्रती संवेदनशीलता जपणारा ना. संजय राठोड यांच्यासारखा लोकप्रतिनिधी लाभणे हे जनतेसाठी सौभाग्याचे लक्षण आहे, असे कौतुकोद्गार सिंधुताई सपकाळ यांनी यावेळी काढले. प्रसंगी त्यांनी महिलांशी संवाद साधताना संस्काराचे महत्त्व पटवून दिले. स्त्रीशिवाय सृष्टीचे अस्तित्व शून्य आहे. त्यामुळे घरात, घराबाहेर स्त्रियांचे सत्व जपून त्यांचा सन्मान करा, पुरुषांचे दु:ख जाणणारी पहिली व्यक्ती ही आपली आई, बहीण, पत्नी, मुलगी अर्थात स्त्रीच असते. त्यामुळे तिला कधी दुखवू नका, असे सिंधुताई म्हणाल्या.

Web Title: Ner Bypass and Tehsil will be soon in operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.