नेरचे वली साहेबनगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:02+5:30
नेर येथे शिक्षक असलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीचे मूळ गाव कारंजा आहे. नेर येथे येण्यापूर्वी ती कारंजाला वास्तव्याला होती. तेथेही त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्याची प्रक्रिया वाशिम जिल्हा प्रशासनाने हाती घतली आहे. नेर शहरातही तो नागरिक राहात असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहरातील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. वलीसाहेबनगर परिसर पूर्णत: सील करण्यात आला आहे. तसेच वाईत जाणारा रस्ता व रत्नापूर ढेका नगराला जोडणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. या भागात निर्जंतूक औषधांची फवारणी केली जात आहे.
नेर येथे शिक्षक असलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या व्यक्तीचे मूळ गाव कारंजा आहे. नेर येथे येण्यापूर्वी ती कारंजाला वास्तव्याला होती. तेथेही त्यांनी खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्याची प्रक्रिया वाशिम जिल्हा प्रशासनाने हाती घतली आहे. नेर शहरातही तो नागरिक राहात असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. तेथील सर्व नागरिकांना होम कॉरंटाईन केले आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी नेर शहरात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली व उपस्थित यंत्रणांना सूचना दिल्या. प्रतिबंधित क्षेत्रासह नेर शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार अमोल पोवार, ठाणेदार प्रशांत मसराम, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, डॉ. प्रदीप खोडवे यांनी केले आहे. सदर शिक्षक नेर येथे वास्तव्यास असताना त्याच्या संपर्कात कोणकोण आले याचा शोध घेतला जात आहे.
त्या रुग्णाने कारंजात केली तपासणी
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नेर येथील रुग्णाने ३ मे रोजी जिल्ह्याची सीमा ओलांडून कारंजा येथे जावून वैद्यकीय तपासणी केली. तेथील डॉक्टरांना संशय आल्यानंतर त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र तत्पूर्वी या रुग्णाने कारंजातील पॅथॉलॉजी, एक्स-रे येथेही तपासणी केल्या. त्यामुळे कारंजातील डॉक्टर दाम्पत्य, त्या खासगी रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ, पॅथॉलॉजी व एक्स-रे क्लिनिकमधील स्टाफ कॉरंटाईन करण्याची प्रक्रिया वाशिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. जवळपास ७० जणांना कॉरंटाईन केले जाणार आहे.
नेर शहर तीन दिवस बंद
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे नेर शहर कडकडीत बंद राहणार आहे. पुढील तीन दिवस अत्यावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.