नेरची ग्रामीण आरोग्य यंत्रणा खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:58 PM2018-01-09T20:58:55+5:302018-01-09T21:00:06+5:30

ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद राहात आहे.

Nerchi Rural Health System | नेरची ग्रामीण आरोग्य यंत्रणा खिळखिळी

नेरची ग्रामीण आरोग्य यंत्रणा खिळखिळी

Next
ठळक मुद्देआरोग्य केंद्राला कुलूप : एका परिचारिकेकडे तीन गावे

आॅनलाईन लोकमत
नेर : ग्रामीण भागाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद राहात आहे. या केंद्रांमध्ये कार्यरत परिचारिकांकडे इतर गावांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गरजू आणि गरीब रुग्णांना नाईलाजाने शहरात जाऊन महागडा उपचार घ्यावा लागत आहे. तालुका आणि जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यात असलेल्या बहुतांश आरोग्य केंद्राचा कारभार आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, सुविधांचा अभाव, अधिकाºयांचे सोयीच्या ठिकाणावरून काम या व इतर कारणांमुळे हे केंद्र नामधारी ठरले आहे. त्यात भरीस भर म्हणजे आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणाºया परिचारिकांवरही अनेक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इतर ठिकाणची जबाबदारी सांभाळत असताना आरोग्य केंद्र कुलूपबंद ठेवले जातात.
मोझर प्राथमिक आरोग्य केंद्रही याला अपवाद ठरले नाही. या केंद्राच्या परिचारिकेवर मोझर, रत्नापूर, लोहतवाडी या तीन गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकट्या मोझरची लोकसंख्या पाच हजार इतकी आहे. लोहतवाडी आणि रत्नापूर या गावची लोकसंख्या प्रत्येकी एक हजार आहे. परिचारिकांना या गावात जाऊन सेवा द्यावी लागते. बाहेरगावी परिचारिका गेल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सांभाळणार कोण, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न अधिकाºयांनी मात्र कधीही लक्षात घेतला नाही. बाहेरगावी असलेल्या परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्रही वेळेवर उघडू शकत नाही. अशावेळी उपचारासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची गरज ग्रामीण भागातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
विविध योजना राहतात कागदावरच
आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहे. मात्र त्या कागदावरच असल्याचे दिसून येते. गरिबांना योजनांचा लाभ अपवादानेच मिळतो. योजना राबविण्यासाठी आवश्यक तेवढी यंत्रणाच तालुक्यात नाही. अशावेळी यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. जिल्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आहे.

Web Title: Nerchi Rural Health System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.