नेरच्या पान विक्रेत्याची मुलगी ‘सीए’ झाली
By Admin | Published: February 20, 2017 01:24 AM2017-02-20T01:24:51+5:302017-02-20T01:24:51+5:30
कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून मिळालेले प्रोत्साहन आणि जिद्दीच्या जोरावर एका पान विक्रेत्याच्या मुलीने यशाची भरारी घेतली आहे.
भरारी : जिद्द व परिश्रमातून मिळविले यश
नेर : कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून मिळालेले प्रोत्साहन आणि जिद्दीच्या जोरावर एका पान विक्रेत्याच्या मुलीने यशाची भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातील शाळेतून शिक्षण घेत सीएची परीक्षा उत्तीर्ण करत तिने नेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पूजा अशोकराव दुधे असे या गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे.
सायकलवर पेटारा बांधून पानठेल्यांवर पान विक्रीच्या करून अशोकराव दुधे यांनी पूजाला सीए करण्याचे ठरविले. दहावीपर्यंतचे शिक्षण येथील इंग्लिश हायस्कूलमध्ये घेतल्यानंतर पूजाने पुढील शिक्षणासाठी अमरावती गाठले. मनीबाई गुजराती कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी झाल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी तिने केशरभाई लाहोटी महाविद्यालयात बी.कॉम.करिता प्रवेश घेतला. प्रत्येक वर्षाला मिळत गेलेल्या यशामुळे तिचा उत्साह वाढत गेला. आपण चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचेच असा निर्धार तिने केला. सतत आठ तास अभ्यास करून तिने सीए परीक्षा उत्तीर्ण केली. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर मिळविलेल्या या यशाच्या तिला सीए राजेश चांडक, काका प्रा. मनोज दुधे यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले. (तालुका प्रतिनिधी)