नेरच्या ताज नर्सिंग होमला अखेर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:37 PM2018-06-29T23:37:52+5:302018-06-29T23:38:39+5:30
सदोष उपचार केल्याने रुग्णांचा मृत्यू आणि बेकायदेशीररित्या रुग्णालय थाटल्याचा ठपका ठेवत येथील ताज नर्सिंग होमला शुक्रवारी अखेर सील ठोकण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : सदोष उपचार केल्याने रुग्णांचा मृत्यू आणि बेकायदेशीररित्या रुग्णालय थाटल्याचा ठपका ठेवत येथील ताज नर्सिंग होमला शुक्रवारी अखेर सील ठोकण्यात आले. या कारवाईला काही लोकांनी विरोध केला. मात्र पोलिसांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
डॉ. शबाना मिर्झा संचालक असलेल्या ताज नर्सिंग होममध्ये सदोष उपचार झाल्याने महिनाभरापूर्वी बाणगाव येथील एका विवाहितेचा, तर पाच दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी या नर्सिंग होमला सील ठोकण्याचे आदेश दिले होते. यानुसार येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव, डॉ. प्रणित खोडवे, नायब तहसीलदार मस्के, पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सचिन पवार आदींनी नर्सिंग होमला सील ठोकण्याची कारवाई पार पाडली. या नर्सिंग होमबाबत अनेक तक्रारी सुरू होत्या.
ताज नर्सिंग होममध्ये चुकीचा उपचार झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत या रुग्णालयाला सील कायम राहणार आहे.
- डॉ. संजय जाधव,
अधीक्षक, शासकीय रुग्णालय, नेर